Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याउत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला

उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्यात जानेवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यत थंडी गायब झाल्यानंतर मागील आठवड्यात नाशिक जिल्ह्यात सर्वात कमी किमान तापमानाची 11.4 अश सेल्सीअस अशी नोंद झाली आहे. त्यानंतर काल राज्यात जळगांव येथे 11.3 अंश अशी राज्यात किमान तापमानाची नोंद झाली असुन उत्तर महाराष्ट्रात थंडीचे पुन्हा आगमन झाले आहे. जिल्ह्यातील निफाड येथील पारा 9 अंश इतका खाली आला आहे.

- Advertisement -

डिसेंबरच्या शेवटच्या व जानेवारीच्या पहिल्या दोन आठवड्यात राज्यात बहुतांशी भागात किमान तापमानात लक्षणिय वाढ होऊन ढगाळ वातावरण निर्माण होऊन मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले होते. यात सर्वाधिक नुकसान ही नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागाईतदार शेतकर्‍यांची झाले होते. यानंतर मात्र राज्यातील थंडी गायब होऊन किमान तापमान 15 ते 20 अंशापर्यत गेले होते. अशा बदलेल्या वातावरणात गेल्या 20 जानेवारीला नाशिक जिल्ह्यात राज्यात सर्वात कमी किमान तापमान 11.4 अंशी नोंद झाली होती.

यानंतर काल जळगांवात कमी तापमानाची नोंद झाली असुन पुणे 12.5, मालेगांव 13 व गोंदिया 13.5 अंश अशा किमान तापमानाची नोंद झाली आहे. विशेषत: राज्यात मध्य महाराष्ट्रात पुन्हा थंडीचे आगमन झाल्याचे दिसत आहे. यात उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यातील गारठा वाढला आहे.

मध्य महाराष्ट्र व लगतच्या भागावर चक्री चक्रवात तयार झाले असुन दक्षिण मध्य महाराष्ट्र ते दक्षिण छत्तीसगडपर्यत कमी दाबाचा पट्टा विरुन गेला आहे.

या हवामानातील बदलामुळे मध्य महाराष्ट्रात तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचीत वाढ झाल्याने थंडीचे आगमन झाले आहे. आज बुलढाणा 14, औरंगाबाद 14.1, महाबळेश्वर 14.4, सातारा 14.6, अकोला 14.7, परभणी 15.9, अमरावती 16, नागपुर व सांगली 17.1, कोल्हापुर 18 अंश सेल्सीअस अशाप्रकारे किमान तापमानाची नोंद झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील किमान तापमान 20 जानेवारीनंतर वर गेल्यानंतर काल पुन्हा 12 अंशावर आल्याने सकाळ व रात्रीचा गारठा वाढला आहे. या वाढल्या थंडीचा परिणाम पिकांवर होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या