Saturday, April 27, 2024
Homeनगरपाचेगाव परिसरात सर्दी, ताप, खोकला आणि अंगदुखीने ग्रामस्थ हैराण

पाचेगाव परिसरात सर्दी, ताप, खोकला आणि अंगदुखीने ग्रामस्थ हैराण

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

नेवासा तालुक्यातील पाचेगाव परिसरात गेल्या आठ-दहा दिवसांपासून प्रत्येक घरात किमान एक ते दोनजण आजारी आहेत. सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी यापैकी एकतरी लक्षण कोणाला न कोणाला आहेच. त्यामुळे या भागातील ग्रामस्थ आजारामुळे हैराण झाले आहेत.

- Advertisement -

गावामध्ये जवळपास चार दवाखाने आहेत. त्यामध्ये जवळपास दिवसभरात चार दवाखाने मिळून तीनशे ते साडेतीनशे रुग्ण स्थानिक डॉक्टरांकडून उपचार घेत आहेत. त्यात सगळे रुग्ण ताप, सर्दी व अंगदुखी या आजाराने ग्रासलेले आहेत. गावातील चार डॉक्टरांकडे गर्दी आहे, त्यात एका डॉक्टरकडे दिवसभरात जवळपास एकशे चाळीस या लक्षणाचे रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. सरासरी गावात चारशे ते पाचशे रुग्णांना ही लक्षणे दिसून येत आहेत.त्यामुळे घाबरून न जाता त्यावर उपचार घ्या, असे आवाहन यावेळी स्थानिक डॉक्टरांनी केले आहे.

सध्या वातावरणातील बदलातून व्हायरसमुळे सध्या नागरिकांना सर्दी, ताप, अंगदुखीचे लक्षणे दिसून येत आहेत. नागरिकांनी यात कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये. अशी कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळून येताच स्थानिक डॉक्टरांना दाखवून घ्या, सध्या गरज नसताना कुठेही फिरू नका, लसीकरण महत्त्वाचे आहे, घरातील कोणीही लसीकरणापासून वंचित ठेऊ नका. पाणी जास्तीत जास्त उकळून प्या, ऊबदार कपडे परिधान करा, मास्क व हाथ हँडवॉशने स्वच्छ करावे, सॅनिटायझरचा वापर करा, हे सर्व अंमलात आणले तर आपण सुरक्षित आणि आपले कुटुंब सुरक्षित राहणार आहे.

– डॉ.वाल्मिक तुवर (पाचेगाव)

सध्या अजूनही करोनाची लाट संपलेली नाही, त्यामुळे नागरिकांनी स्वतःची व कुटुंबातील सदस्यांची काळजी घेणे. सर्दी, ताप अंगदुखीने नागरिक हैराण झालेले असून सध्या प्रत्येक एक-दोन रुग्ण या त्रासाने ग्रासलेले आहेत. या थंडीच्या वातावरणात ऊबदार कपडे परिधान करावे, पाणी उकळून प्यावे, मास्क व हाथ हँडवाश करावे. सॅनिटायझरचा वापर करावा, अशी काही लक्षणे दिसून आली तर गावातील आरोग्य उपकेंद्राशी संपर्क करावा.

– डॉ संदीप भालेराव, समुदाय आरोग्य अधिकारी, (पाचेगाव उप आरोग्य केंद्र)

- Advertisment -

ताज्या बातम्या