Saturday, April 27, 2024
Homeनगरआचारसंहिता भंग प्रकरणी साकुरच्या खेमनरांवर गुन्हा दाखल

आचारसंहिता भंग प्रकरणी साकुरच्या खेमनरांवर गुन्हा दाखल

घारगाव |वार्ताहर| Ghargav

ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता लागू असताना निवडणूक प्रचाराची सभा घेतल्याने संगमनेर तालुक्यातील साकुर येथील दोघांविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

साकुर परिसरातील सार्वत्रिक निवडणुका कामी ग्रामपंचायत बिरेवाडी कार्यक्षेत्रात दि. 28/06/22 ते 11/08/22 या काळात निवडणुक प्रचार कालावधी संपले नंतर दि. 03/08/22 रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शंकर हनुमंता खेमनर व थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित अशोक खेमनर (दोघे राहणार साकुर, ता. संगमनेर) यांनी बिरेवाडी येथील दुमके वस्तीवर निवडणूक प्रचाराची सभा घेतली. याबाबत वैशाली ढेंबरे व इतर 34 ग्रामस्थ यांनी आचारसंहिता कक्ष प्रमुखाकडे लेखी तक्रार केली होती.

कक्ष प्रमुखांनी अर्जानुसार लेखी जबाब घेऊन चौकशी केली. त्यानुसार आचारसंहिता भंग झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यानुसार पंचायत समिती विस्तार अधिकारी संजय रामनाथ वाकचौरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील दोघांविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 281/2022 भारतीय दंडसंहिता कलम 171 सी उपकलम (1) व लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 चे कलम 126 (1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दशरथ वायाळ हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या