Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशवंदे भारत एक्स्प्रेच्या जेवणात आढळले झुरळ ; आयआरसीटीसीकडून कडक कारवाई

वंदे भारत एक्स्प्रेच्या जेवणात आढळले झुरळ ; आयआरसीटीसीकडून कडक कारवाई

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi

वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) या विद्यमान भारतीय रेल्वेतील सर्वाधिक आधुनिक रेल्वे म्हणून ओळखल्या जातात. वंदे भारत ट्रेनची निर्मिती पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मेक इन इंडिया (Make In India) संकल्पनेतून करण्यात आली आहे. ही रेल्वे भारतीय बनावटीची पहिली सेमी हाय-स्पीड रेल्वे म्हणून ओळखली जाते. मात्र याच वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये एक खळबळजनक प्रकार घडला आहे. वंदे भारत एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाच्या जेवणात चक्क झुरळ (Cockroach In Food) आढळल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

आयआरसीटीसीकडून (IRCTC Food Service) मागवलेल्या जेवणात झुरळ आढळल्याने प्रवाशी चांगलाच संतप्त झाला होता. या प्रवाशाने त्याच्यासोबत घडलेल्या प्रकाराची तक्रार थेट रेल्वे प्रशासनाकडे केल्यानंतर आयआरसीटीसीने सेवा देणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई केली आहे. या प्रकारानंतर संतप्त झालेल्या प्रवाशाने अन्नात झुरळ निघाल्याचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत.

Rain Alert : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला पावसाचा ‘रेड अलर्ट’ तर मराठवाड्यासह विदर्भात ‘यलो अलर्ट’

दरम्यान, ही घटना २४ जुलै रोजी घडली असून संबंधीत प्रवासी राणी कमलापती (हबीबगंज)- हजरत निजामुद्दीन वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास करत होता. यावेळी हा प्रकार उघडकीस आला. प्रवाशाने वंदे भारतमध्ये प्रवासादरम्यान आयआरसीटीसीकडून जेवण मागवले ज्यात ज्यूस आणि जेवणाचे दोन पाकीटं होती. त्यात चपाती आणि भाजी होती. प्रवाशाने यातील थोडी चपाती खाल्ली मात्र नंतर त्याने ही चपाती निरखून पाहिली असता त्यात मेलेले झुरळ आढळून आले.

मोठी बातमी! विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या ४० आमदारांच्या अपात्रतेबाबत घेतला ‘हा’ निर्णय

प्रवाशासोबत हा किळसवाणा प्रकार घडल्यामुळे त्याला उलटी आणि मळमळसारखे जाणवले. दरम्यान या संतापजनक प्रकारामुळे त्याने या घटनेचा फोटो ट्विटरवर वंदे भारतला टॅग करत घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार केली. तसेच रेल्वेप्रशासनाकडे ही तक्रार केली. दरम्यान, हा प्रकार गंभीर असून रेल्वेत देण्यात येणाऱ्या पदार्थांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

दरम्यान, या घडलेल्या घटनेनंतर भोपाळच्या डिव्हिजनल रेल्वे मॅनेजरने स्पष्ट केल असून संबंधित प्रवाशाला दुसरे अन्न पदार्थ देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच संबंधित ठेकेदारावर कारवाई करत २५ हजारांचा दंड ही ठोठावण्यात आल्याचे प्रवाशाला कळविण्यात आले असून कठोर इशाराही देण्यात आला आहे. पुन्हा असा प्रकार घडता कामा नये, अशी तंबीही देण्यात आल्याची मध्य रेल्वेच्या प्रवक्त्याने दिली आहे.. दरम्यान, अनेक प्रवाशांनी अन्नाच्या खराब गुणवत्तेबाबत तक्रारी केलेल्या असून आयआरसीटीसीने उत्तम क्वालिटीचे अन्न देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या