Monday, April 29, 2024
Homeनगरमहावितरण खासगीकरणाच्या चर्चेबाबत राज्यमंत्री चिंतीत

महावितरण खासगीकरणाच्या चर्चेबाबत राज्यमंत्री चिंतीत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यात कोळश्याच्या तुटवड्यामुळे (Coal shortages) लोडशेडींगचे संकट (Crisis of Load Shedding) असताना केंद्र सरकार (Central Government) महाविरतणचे खाजगीकरण (Privatization of Mahavitaran) करण्याच्या तयारीत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. या चर्चांवर राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Minister of State for Energy Prajakt Tanpure) यांनी चिंता व्यक्त केली.

- Advertisement -

नगर तालुक्यातील (Nagar Taluka) महावितरणाचा आढावा घेतल्यानंतर मंत्री तनपुरे (Minister of State for Energy Prajakt Tanpure) बोलत होते. राज्यात गेल्या 25 वर्षात शेतीच्या वीजेचा भार वाढला आहे. त्या तुलनेत महावितरणची यंत्रणा वाढविण्यात आलेली नाही. यामुळे आता वीज वितरण कंपनीवर ताण वाढला असून यंत्रणा ओव्हरलोड (System Overload) झालेली आहे. ऑगस्ट महिन्यांत पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेती पंपाव्दारे पाणी देण्याची वेळ आली. यामुळे ऑगस्ट महिन्यांच्या नियोजनपेक्षा वीजेची मागणी (Demand for Electricity) वाढली. यामुळे काही प्रमाणात विजेचा तुटवडा वाढला.

सध्या राज्यात एक ते दीड हजार मेगा वॅट विज कमी पडत असून विशेष करून सकाळी 6 ते 9 आणि सायंकाळी 7 ते रात्री 10 या काळात वीजेचा तुटवडा निर्माण होत आहे. यासाठी याकाळात वीजेचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन केले होते. याकाळात सुरळीत वीज पुरवठा सुरू राहावा, यासाठी राज्य सरकारने (State Government) 17 रुपये युनिट ऐवढ्या महागड्या दराने वीज विकत घेवून ती ग्राहकांना उपलब्ध करून दिली. मात्र, आता परिस्थिती सुधारत असल्याचा दावा त्यांनी केला.

दुसरीकडे महावितरणचे खाजगीकरण होऊ शकते, अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. याची मला भिती वाटते. असे जर झाले अन् खाजगी कंपनी वीज वितरण करायला बसली तर शेतकर्‍यांकडून दुष्काळ, ओला दुष्काळ पडलाय हे न बघता सरसकट जुलमी पध्दतीने वीज बिल वसुली होईल. यातून शेतकर्‍यांना अवघड दिवस येतील. राज्य सरकार आज सबसिडीच्या दराने वीज वितरीत करतय. 2.5 रूपये राज्य सरकार महावितरण कंपनीला देते. बरीचशी सबसिडी उद्योगातून देते. जवळपास 25 टक्के जो काही खर्च येतो, तोच आपण शेतकर्‍याकडून घेतो. वसुलीची सक्ती करत नाही. जी परिस्थिती आहे ते पाहून निर्णय घेत असतो. मला जी भिती वाटतेय तसे झाले तर शेतकर्‍यांवर मोठे संकट येऊ शकते, अशी भिती मंत्री तनपुरे यांनी व्यक्त केली.

दहा ठिकाणी नवीन सबस्टेशन

जिल्ह्यात दहा ठिकाणी 33 बाय 11 केव्हीचे वीजेचे नवीन सबस्टेशन उभारण्यात येणार आहेत. यातील काही जागांचे हस्तांरण झालेले आहे. यात घोगरगाव, धनगरवाडी (नेवासा), ब्राम्हणगाव (कोपरगाव), पुणेवाडी आणि (आळकुटी विस्तारीकरण) (पारनेर), घुमरी (कर्जत), पिंपळगाव माळवी (नगर), वांजुळपोई आणि चिखलठाण (राहुरी), चिखली (श्रीगोेंदा) यांचा समावेश आहे.

महावितरणमध्ये शिस्त लावण्याचा प्रयत्न

महावितरण कंपनीमध्ये काही अधिकारी आणि कर्मचारी यांना शिस्त लावण्यात येत आहे. यासाठी तालुकानिहाय बैठक घेवून अडचणी समजून घेण्यात येत आहे. शेतकर्‍यांना वेठीस धरणार्‍या अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात आली असून काहींच्या कामकाजाची वरिष्ठांमार्फत चौेकशी करण्यात येत असल्याचे तनपुरे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या