Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रकारखाने भाडेपट्ट्यावर देताना सहकारी साखर कारखान्यांना प्रथम प्राधान्य

कारखाने भाडेपट्ट्यावर देताना सहकारी साखर कारखान्यांना प्रथम प्राधान्य

सुखदेव फुलारी

नेवासा | Newasa –

- Advertisement -

राज्यातील आर्थिकदृष्टया आजारी, अवसायनात असलेले सहकारी साखर कारखाने भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याबाबत राज्य शासनाने

नवीन निकष निश्चित केले आहेत.

या नवीन निकषांच्या आधारे आता राज्यातील कारखाने चालविण्यास देण्याबाबत हालचाली होतील. खानदेश-विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र असे विभागवार वर्गीकरण करण्यात आले आहे.पश्चिम महाराष्ट्रातील आजारी कारखाना चालविण्यास घेणार्‍या कंपनीला तुलनेने जादा रक्कम मोजावी लागणार आहे. भाडेतत्वाबराबेरच सहयोगी व भागीदारी या स्वरुपातही कारखाने चालविण्यास घेता येऊ शकतील. यासाठी स्वतंत्र अटी आहेत. सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंडळाने नुकताच आदेश काढून याबाबतच्या अटींचे स्पष्टीकरण केले आहे. आसवनी, इथेनॉल, सहवीज प्रकल्पही चालविण्यास देण्याबाबतची नियमावली करण्यात आली आहे.

पुनरुज्जीवन अवसायकाने भाडे कराराची मुदत संपताच शक्य असल्यास कारखान्यांचे पुनरुज्जीवन करावे. हे शक्य नसल्यास कारखान्याची मालमत्ता विक्री करावी व अवसायनाचे काम पूर्ण करावे अथवा शासनाच्या सहमतीने परत भाडेतत्त्वावर साखर कारखाना देण्याबाबत निर्णय घेण्यात यावा. कारखाना विक्री करताना अथवा दुसर्‍यांदा साखर कारखाना भाडेतत्त्वावर देताना कारखाना चालविण्यास घेतलेल्या कंपनीस मालमत्ता खरेदीसाठी प्राधान्य देण्यात यावे असे शासनाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

आजारी साखर कारखान्यांची व्याख्या अशी…

* मागील सलग तीन आर्थिक वर्षे संचित तोटा .

*बाहेरील कर्जउभारणी मर्यादा संपुष्टात आलेली असणे .

* सलग तीन वर्षे लेखापरीक्षण क किंवा ड असणे.

* गेल्या तीन हंगामात क्षमतेपेक्षा पन्नास टक्क्यांहून कमी ऊस गाळप असणे

* शासकीय अर्थ सहाय्याची थकबाकी असणे.

* कारखान्याची किमान प्रति वर्षी निश्चित भाडेपट्टी असेल

कारखान्याचा भाडेकराराचा कालावधी व कारखाना भाडेतत्वावर देण्याची कार्य पध्दती –

* भाडेकराराचा कालावधी किमान 5 व कमाल 15 वर्षापर्यंत राहील.

* वरील नमूद निश्चित प्रति वर्ष भाड्या शिवाय प्रती मे.टन गाळपावर भाडे आकारणीनुसार कारखान्याने ई-निविदा मागवाव्यात.

* कारखाना भाडेतत्वावर देताना ई-निविदा प्रक्रिया राबवणेआवश्यक राहील.

* ई-निविदेमध्ये किमान प्रतिवर्षी निश्चित भाडे, प्रती मे टन गाळपावरील मुदत इ. बाबींचा उल्लेख आवश्यक राहील.

* अनामत रक्कम म्हणून भाडेतत्वावर घेणाीर्‍या कारखान्याने, कंपनीने वर नमूद केलेल्या एक वर्षाच्या निश्चित भाड्याइतकी रक्कम कारखान्याकडे बिनव्याजी जमा करावी लागेल अथवा तेवढ्या रक्कमेची बँक गॅरंटी द्यावी लागेल.

* भाडेतत्वावर घेणार्‍या कारखान्याांने, कंपनीने दर वर्षीचे भाड्याच्या 50% रक्कम हंगाम सुरु होण्यापूर्वी व उर्वरित 50% रक्कम हंगाम सुरु झाल्यानांतर 3 महिन्यात भरणे बंधनकारक राहील.

* कोणत्याही कारणास्तव कारखान्यास गाळप हंगाम घेता आला नाही तरीही प्रति वर्षीचे निश्चित भाडे भरण्याचे बंधन कारखान्यावर राहील. ती रक्कम न भरल्यास अनामत रक्कमेतून रक्कम जप्त करण्यात येईल व भाडे करार संपुष्टात आणण्यात येईल.

* कारखाना भाडेतत्वावर देताना सहकारी साखर कारखान्याना प्रथम प्राधान्य राहील. तथापि, खाजगी कारखान्याचे,कंपनीचे निविदे मधील दर जास्त असल्यास सहकारी साखर कारखान्यास त्या दराची बरोबरी करण्याची संधी राहील.

* भाडेकराराच्या मुदतीत मिळालेले भाडे कारखान्याने शासकीय देणी, वित्तीय संस्थांच्या मुद्दलाची परतफेड करणे तसेच जुनी कामगार देणी व शेतक़र्‍याांची देणी यासाठी वापरावे.

सहकारी साखर कारखान्याचे आसवणी / इथेनॉल / सहवीज प्रकल्प भाडेतत्वावर देणे साठी (उपप्रकल्पाकरीता) दहा प्रकारचे निकष व अटी निश्‍चित केल्या आहेत. तरसहकारी साखर कारखान्याांने आसवणी प्रकल्प /इथेनॉल प्रकल्प /सहवीज प्रकल्प भाडेतत्वावर घेणे साठीदेखील 7 निकष व अटी निश्‍चित करण्यात आल्या आहेत.

सहकारी साखर कारखाने दृष्टिक्षेपात…

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची संख्या : 202

अवसायनात निघालेले : 45

बंद साखर कारखाने : 22

भागीदारी तत्त्वावर देण्यात आलेले कारखाने : 09

- Advertisment -

ताज्या बातम्या