Friday, April 26, 2024
Homeनगरसंस्थेची कर्जाची नोटीस हातात पडली अन् त्यांनी जीवनयात्राच संपविली

संस्थेची कर्जाची नोटीस हातात पडली अन् त्यांनी जीवनयात्राच संपविली

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील (Rahuri Taluka) केसापूर (Kesapur) येथील शेतकर्‍याच्या हातात सहकारी संस्थेची कर्जाची नोटीस (Co-operative Society Loan Notice) आली. अन् त्यांनी मंगळवारी रात्री झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली (Suicide). दुसर्‍या दिवशी बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर केसापूर (Kesapur) परिसरात शेतकर्‍यांनी हळहळ व्यक्त केली.

- Advertisement -

केसापूर (Kesapur) येथील शेतकरी महादू सहादू कोतवाल (वय 82) यांनी दोन दिवसापूर्वी केसापूर सोसायटीचे थकीत कर्ज (Near Debt of Kesapur Society) भरण्यासंदर्भात पोष्टाने नोटीस मिळाली. आता हे कर्ज कसे फेडणार कसे? याच चिंतेत ते दोन दिवस हतबल झाले होते. मंगळवारी रात्री उशिरा ते घराबाहेर पडले. बाहेर पडण्यापूर्वी सोसायटीच्या कर्जाच्या नोटिशीच्या पाठीमागील बाजूस मी आत्महत्या (Suicide) करत आहे. माझ्या आत्महत्येला घरातील कोणालाही जबाबदार धरु नये. मला सोसायटीचे कर्ज कसे फेडायचे? हा प्रश्न असल्याने कर्जापायी मी जीवनयात्रा संपवित असल्याची चिठ्ठी लिहून त्यांनी रात्री आत्महत्या केली. बुधवारी सकाळी आत्महत्या (Suicide) केल्याचे उघड झाले.

दरम्यान, त्यांचा मृतदेह ग्रामिण रुग्णालयात दाखल केला. परंतु वैद्यकीय सुत्राने त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदन करुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या