नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच उडणार सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा धुराडा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यात करोनाचे संकट उद्भवल्याने सर्व सहकारी संस्थांसह मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींना मुदतवाढ देण्यात आली आहे.

पण जानेवारी 2021 मध्ये सहकारी संस्थांच्या निवडणुका होण्याची चिन्हे दिसत असून त्यादृष्टीने सहकार प्राधिकरणाने तयारी सुरू केली आहे. यात नगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या शिखर संस्था, सहकारी साखर कारखाने, जिल्हा बँका, मोठे दूध संघ अशा मोठ्या संस्थांच्या निवडणुका जानेवारीत होण्याची शक्यता आहे.

नव्या बदलानुसार आता आर्थिक वर्ष संपल्यानंतर चार महिन्यांऐवजी 9 महिन्यांत लेखापरीक्षण, तर आर्थिक वर्ष संपल्यानंतर सहा महिन्यांऐवजी बारा महिन्यांपर्यंत वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

ग्रामपंचायत, नगरपंचायत आणि पालिकांच्याही निवडणुका

नगर जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायती, अकोले, कर्जत, पारनेर नगरपंचायती आणि शेवगाव, जामखेड पालिकांच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे आगामी काळात या निवडणुका रंगणार आहेत.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *