Thursday, April 25, 2024
Homeनगर1 हजार 916 संस्थांच्या निवडणूका आता मार्च 2021 नंतर

1 हजार 916 संस्थांच्या निवडणूका आता मार्च 2021 नंतर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना साथ आटोक्यात येण्यास कालावधी लागणार असल्याने राज्य सरकारच्या सहकार विभागाने 2020 मध्ये मुदत संपलेल्या

- Advertisement -

आणि न्यायालयाचा आदेश वगळता अन्य सहकारी संस्थांच्या निवडणूका पुन्हा मार्च 2021 पर्यंत म्हणजे तीन महिने पुढे ढकल्या आहेत. जिल्ह्यात 2020 मध्ये मुदत संपलेल्या 1 हजार 916 संस्था असून या संस्थांच्या निवडणूका आता मार्च 2021 नंतरच होणार आहेत.

महाराष्ट्र सहकारी अधिनियमचे कलम 1960 च्या कलम क क मधील तरतुदीनूसार कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये जनहिताच्यादृष्टीने कोणत्याही सहकारी संस्थांच्या निवडणूका एक वर्षाहून अधिक असणार नाहीत इतक्या कालावधीसाठी पुढे ढकलण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे.

त्या अधिकाराचा वापर करत सरकारने करोना संसर्ग आटोक्यात येण्यास विलंब होणार असल्याने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूका पुन्हा तीन महिन्यांसाठी पुढे ढकल्या आहेत. मात्र, पुढे ढकलण्यात आलेल्या संस्थांमध्ये न्यायालयाने निवडणूका घेण्याचा आदेश दिलेल्या संस्थांना वगळण्यात आले असून यात नगरच्या जिल्हा बँकेसह जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांचा समावेश असून याच्या निवडणूका सुरू राहणार आहेत.

पण 2020 मध्ये मुदत संपणार्‍या ब वर्गातील 888, क वर्गातील 551 आणि क वर्गातील 477 अशा 1 हजार 916 संस्थांच्या निवडणूका या तीन महिन्यांसाठी पुढे गेल्या आहेत.

विशेष म्हणजे सहकार निवडणूक प्राधिकरणाने 12 जानेवारीला पत्र काढून 2020 मध्ये मुदत संपणार्‍या सहकारी संस्थांच्या टप्प्याने निवडणूक कार्यक्रम हाती घेण्याचे आदेश दिले होते. त्यानूसार उपनिबंधक कार्यालय उद्या सोमवारपासून निवडणूक कार्यक्रम सुरू करणार होते. मात्र, राज्य सरकारने नव्या आदेशामुळे पुन्हा तीन निवडणूका पुढे गेल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या