Wednesday, April 24, 2024
Homeनगरसहकार निवडणुकीचा आज कार्यक्रम ?

सहकार निवडणुकीचा आज कार्यक्रम ?

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यातील सहकारी संस्थांसह नगर जिल्ह्यातील 2020 मध्ये मुदत संपलेल्या सर्व सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम आज (बुधवारी) जाहीर होण्याची शक्यता सुत्रांनी वर्तविली.

- Advertisement -

राज्य सरकारच्या सहकार खात्याने मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यासाठी नव्याने संपूर्ण प्रक्रिया राबविण्यात या मागणीसाठी औरंगाबाद, परभणी, बीड जिल्हा बँका आणि अन्य सहकारी संस्था न्यायालयात गेल्या होत्या. न्यायालयाने या बँकांवर एकत्रित सुनावणी घेवून सर्व बँकाची आणि संस्थांची याचिका रद्द ठरवली आहे.

आता सहकार प्राधिकरणाच्या आदेशानूसार आहे त्या स्थितीत निवडणूका घेण्यात येणार आहेत. यामुळे राज्यातील अन्य सहकारी संस्थांसह नगर जिल्ह्यातील 2020 मध्ये मुदत संपलेल्या सर्व 1916 संस्थांचा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या