Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकनासाकासाठी पुन्हा फेर निविदा; सहकार मंत्र्यांचे आदेश

नासाकासाठी पुन्हा फेर निविदा; सहकार मंत्र्यांचे आदेश

देवळाली कॅम्प | वार्ताहर | Deolali Camp

गेल्या आठ वर्षापासून बंद असलेला नाशिक सहकारी साखर कारखाना (Nasaka) सुरू करण्यासाठी सहकार मंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत टेंडरमधील काही अटी शर्तींची पूर्तता करण्यासाठी फेर निविदा (Re-Tender) काढण्याचे आदेश सहकार मंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी दिल्याने कारखाना (Factory) सुरू होण्याची प्रक्रिया पुढे ढकलली गेली आहे…

- Advertisement -

नाशिक (Nashik), सिन्नर (Sinnar), इगतपुरी (Igatpuri) व त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) या चार तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेला नाशिक कारखाना सुरू करण्यासाठी आ. सरोज अहिरे (Saroj Ahire) व खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सहकारमंत्र्यांना नासाका सुरू करण्याबाबत निर्णय घेणे गरजेचे असल्याचे सांगितले.

त्यानुसार तीन वेळा शासकीय बैठका झाल्या. मागील बैठकीत मंत्र्यांनी आदेशित केल्यानुसार जिल्हा बँकेने ऑनलाइन भाडे तत्त्वाची टेंडर प्रक्रिया राबवली असता त्यात लक्ष्मी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने निविदासह डिपॉझिटची रक्कम जमा केली होती.

या टेंडरवर निर्णय घेण्यासाठी आज सहकारमंत्री पाटील यांच्या दालनात साखर बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस मंत्री बाळासाहेब पाटील, खा. हेमंत गोडसे, आ. सरोज अहिरे, माजी खा. देवीदास पिंगळे, आ. दिलीप बनकर यांच्यासह जिल्हा बँकेचे प्रशासक अरिफ मोहम्मद, प्रादेशिक सहसंचालक मिलिंद भालेराव, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश पिंगळे,

प्राधिकृत अधिकारी दिपक पाटील, मतीन बेग, कारखान्याचे अवसायक रतन जाधव, शहाजीराजे भोसले, दीपक चांदे, अजिंक्य गोडसे, सागर गोडसे, माजी चेअरमन तानाजी गायधनी, कामगार युनियन अध्यक्ष विष्णुपंत गायखे, शिवराम गायधनी, नामदेव बोराडे, भाऊसाहेब ढिकले, अंबादास ढिकले आदी उपस्थित होते तर साखर आयुक्त शेखर गायकवाड हे ऑनलाइन सहभागी झाले.

कारखान्याच्या संदर्भात बैठकीत सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षासभासदांकडून व्यक्त केली जात असताना प्रक्रिया तांत्रिक कारणाअभावी पुढे ढकलली गेल्याने शेतकरी व कामगारांमध्ये निराशेचा वातावरण निर्माण झाले आहे.

मात्र कोणत्याही परिस्थितीत नाशिक कारखाना सुरू करून शेतकरी व कामगारांना न्याय देण्याचा आपला प्रयत्न असेल, अशी प्रतिक्रिया खा. हेमंत गोडसे व आ. सरोज अहिरे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या