Friday, April 26, 2024
Homeनाशिकसहकार व लेखा पदविका परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

सहकार व लेखा पदविका परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

नाशिक | प्रतिनिधी Nashik

सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था Commissioner and Registrar of Co-operative Societies यांचे मार्फत शासकीय सहकार व लेखा पदविका आणि सहकार गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र Cooperative Housing Management Certificate exam सी.एच.एम. २०२० ही परीक्षा २३, २४ व २५ ऑक्टोंबर २०२१ रोजी होणार आहे.

- Advertisement -

सदर परीक्षा नाशिक येथील के.टी.एच.एम. कॉलेजमधील मराठा हायस्कुल येथील नवीन व जुनी इमारत या परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार असल्याची, माहिती जिल्हा उपनिबंधक डॉ. सतिश खरे यांनी दिलीे.

सदर परीक्षेसाठी ज्या उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज केले असुन, ज्यांची निवड करण्यात आली आहे, असे उमेदवार या परीक्षेसाठी पात्र असणार आहेत. या परीक्षेसाठी लागणारे प्रवेशपत्र संबंधित उमेदवारांनी आपल्या ऑनलाईन युजर आयडीचा वापर करून प्राप्त करून घ्यावेत. अथवा प्रवेशपत्र वेळेवर प्राप्त न झाल्यास परीक्षार्थीनी फी भरलेला फॉर्म व चलनाच्या प्रतीवरुन यादीतील त्यांचे नाव तपासून पॅनकार्ड, मतदान कार्ड, वाहनचालक परवाना आदी ओळखपत्रांद्वारे संबंधीत परीक्षार्थीना परीक्षेस बसण्याची परवानगी देण्यात येणार आहे.

परीक्षार्थीना परीक्षेबाबतच्या अधिक माहितीसाठी सारडा सर्कल येथील जिल्हा उपनिबंधक यांच्या कार्यालयाच्या २५९१५५५ या क्रमांकावर संपर्क साधावा,

मॅॅनेजमेंट ऑफ को-ऑप हाऊसिंग सोसायटीज व अकाउंट हा पेपर ता. २३,ऑडिटिंग व हिस्ट्री, प्रिन्सिपल्स ण्ड मॅनेजमेंन्ट इन को-ऑपरेशन हा पेपर ता.२४, को-ऑपरेटिव्ह लॉज ऍण्ड अदर लॉज व को-ऑपरेटिव्ह बँकींग अँड क्रेडिट सोसायटीज. ता.२५ ला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या