Wednesday, April 24, 2024
Homeनगरपंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत संकल्प पूर्तीसाठी मध्यप्रदेश सरकारचा सहभाग

पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत संकल्प पूर्तीसाठी मध्यप्रदेश सरकारचा सहभाग

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

पंतप्रधान नरेंद्र मोदी गतीने देशाला पुढे घेऊन चालले आहे. 2026 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन पर्यंत बनवण्याचा व आत्मनिर्भर भारत करण्याचा संकल्प पंतप्रधानांचा आहे. त्यांच्या या संकल्प पूर्तीसाठी मध्य प्रदेश जास्तीत जास्त सहभाग देईल. त्याचप्रमाणे इतरही राज्य चांगला सहभाग नोंदवतील. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीपथावर आहे, असे प्रतिपादन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले.

- Advertisement -

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शनिवारी शिर्डी येथे साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. शिवराज सिंह चव्हाण हे दरवर्षी नववर्षाच्या पूर्वसंध्येला कुटुंबासह साई समाधीचे दर्शन घेतात. यावर्षीही त्यांनी 31 डिसेंबरला शिर्डी येथे येऊन साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. साईबाबा संस्थानच्या वतीने प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला.

दर्शनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, दरवर्षी मी 31 डिसेंबरला साईबाबांच्या दरबारात हजेरी लावतो. साईबाबांना प्रार्थना केली की बाबा सर्वांवर आशीर्वादाचा वर्षाव करून सर्वांना सुखी ठेवा. सर्वांना चांगले आरोग्य लाभो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला ज्या गतीने पुढे नेत आहे त्यातून आत्मनिर्भर भारत स्वावलंबी भारत बनणार आहे. 2026 पर्यंत भारताला पाच ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचा पंतप्रधानाचा संकल्प असून या संकल्पनात मध्यप्रदेश राज्य जास्तीत जास्त सहभाग नोंदवेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या