Friday, April 26, 2024
Homeराजकीयपश्चिम बंगालवर अर्थमंत्र्यांची कृपा; ममता बॅनर्जी म्हणाल्या..

पश्चिम बंगालवर अर्थमंत्र्यांची कृपा; ममता बॅनर्जी म्हणाल्या..

दिल्ली l Delhi

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी विविध मोठ्या मोठ्या घोषणा केल्या आहेत.

- Advertisement -

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थसंकल्पातून पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि तामिळनाडू या राज्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहे. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये कोलकाता-सिलीगुडीसाठी नॅशनल हायवे प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली आहे.

ममता बॅनर्जी यांनी म्हंटले आहे की, “आम्हाला चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही. ‘मा, माटी, मानुष’ याच्या जोरावर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे सरकार पुन्हा निवडून येईल. भाजप हा केवळ गॅसचा फुगा आहे,” असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले.

दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात विविध घोषणा केल्या. प्रामुक्याने देशभरात आगामी काळात विधानसभा निवडणूक पार पडणाऱ्या राज्यांवर अर्थमंत्र्यांची विशेष मर्जी दिसून आली. खास करुन अमस, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू राज्यांमध्ये रस्तेनिर्माण करण्याची घोषणा केली. अर्थमंत्र्यांनी पश्चिम बंगाल राज्यांमध्ये 95,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह 675 किलोमीट लांबीचा हायवे बनविण्यात येईल. हा महामार्ग कोलकाता ते सिलीगुडी या दोन शहरांना जोडणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रात नागपूर आणि नाशिक मेट्रोसाठीही भरीव तरदूद करण्यात आली आहे.

अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सडक, परिवहण आणि राज्यमार्ग आदींसाठी 1.18 लाख कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. याअंतर्गत केरळ मध्ये 65000 कोटी रुपयांची गुंतवणूक करुन 1100 किलोमीटर लांबीचा राज्य मार्ग बनविण्यात येईल. असममध्ये 19 हजार कोटी रुपयांच्या सडक योजनेचा विस्तार केला जता आङे. पुढच्या तीन वर्षांमध्ये 1300 किलोमीटर लांबीचे रस्ते बनविण्यात येतील. दक्षिणेकडील राज्य तामिळनाडूमध्ये 3500 किलोमीटर लांबीच्या हायवेची निर्मिती केली जाईल. तामिळनाडूत नॅशनल हायवे प्रोजेक्ट आणि इकॉनॉमिक कॉरिडोर 1.03 लाख कोटी रुपयांचा असेल. याशिवाय मुंबई कन्याकुमारी इकॉनॉमिक कॉरिडोरचीही घोषणा करण्यात आली आहे. तसेच अर्थमंत्र्यांनी पुढच्या तीन महिन्यांमध्ये हायवे आणि इकॉनॉमिक कॉरिडोअर बनविण्याचीही घोषणा केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या