Friday, April 26, 2024
Homeनगरकेजरीवाल दोषी असतील तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे - अण्णा हजारे

केजरीवाल दोषी असतील तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे – अण्णा हजारे

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

दिल्लीतील आप सरकार (AAP Government) तसेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांना दारू धोरणाबाबत आपण पत्र लिहुन त्यांना सावध केले होते. परंतु यानंतरही त्यांनी काही निर्णय घेतले. सीबीआय (CBI) चौकशीत ते दोषी आढळले तर त्यांनाही शिक्षा झालीच पाहिजे. असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

दिल्ली सरकारने (Delhi Government) मद्य विक्री धोरणात घेतलेल्या निर्णयात घोटाळा (Scam) झाल्याचे आरोप असून त्याची सीबीआय (CBI) मार्फत चौकशी सुरू आहे. यामध्ये दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना आधीच अटक झाली आहे. आता केजरीवाल यांनाही सीबीआयने (CBI) चौकशीसाठी बोलाविले आहे. या कारवाईसंबंधी प्रसार माध्यमांनी राळेगण सिद्धी (Ralegan Siddhi) येथे अण्णा हजारे (Anna Hazare) यांना प्रतिक्रिया विचारली.

हजारे म्हणाले, आमच्या भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनातूनच आम आदमी पार्टीचा (Aam Aadmi Party) जन्म झाला. त्यांनी राजकाराणात जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही मात्र आमचा तो मार्ग नसल्याचे सांगितले. त्यावेळी एकही दिवस असा नव्हता की मी या लोकांना शुद्ध आचारविचासंबंधी सल्ला दिला नाही. मी पूर्वीच केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांना एक पत्र लिहिले होते. त्यांना सांगितले होती की हा दारूचा विषय सोडून द्या. दारूमुळे कोणाचेही भले झालेले नाही. पैशासाठी काहीही करणे अयोग्य आहे. चांगल्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, असा सल्लाही आपण पत्राद्वारे त्यांना यापुर्वीच दिल्याचे अण्णांनी (Anna Hazare) सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या