Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्र३ मे नंतर किती मुभा द्यायची अजून सांगू शकत नाही; जिल्हाबंदी कायम...

३ मे नंतर किती मुभा द्यायची अजून सांगू शकत नाही; जिल्हाबंदी कायम – मुख्यमंत्री ठाकरे

नॉन-कोविड रुग्णांसाठी डायलिसीस सेंटर, हृदयविकार, कर्करोगग्रस्तांसाठी उपचार सुरु, डॉक्टरांनी दवाखाने बंद करू नये

मुंबई | प्रतिनिधी 

नॉन-कोविड रुग्णांसाठी डायलिसीस सेंटर, हृदयविकार, कर्करोगग्रस्तांसाठी उपचार सुरु करणे गरजेचे आहेत. त्यामुळे खासगी डॉक्टरांनी दवाखाने बंद करू नयेत. करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढलीच तर वरळी आणि गोरेगाव येथील प्रदर्शनांची मैदानांवर आपण रुग्णांची सोय करण्याचे कार्य करत आहोत. संकटावर मात करावयाची असून आत्मविश्वास महत्वाचा असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

ते आज राज्याला संबोधित करताना बोलत होते. ते म्हणाले राज्यातील नागरिकांनी सुरक्षित अंतर पाळले तरच करोनावर मात करणे शक्य होणार आहे. राज्यात कुन्हीही उपाशी राहणार नाही यासाठी सरकार बांधील आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. केंद्र सरकारसोबत वेळोवेळी बोलणे सुरु आहे.

केंद्रीय पथकाने राज्यातील व्यवस्थेवर समाधान व्यक्त केले असल्याचे ते म्हणाले. राज्यामध्ये टाटा, अंबानी, इस्सार यांच्यासारख्या अनेक उद्योगपतींनी मदतीचा हात देत ठिकठिकाणी सामाजिक कार्य त्यांनी सुरु केले आहे.

महाराष्ट्रात अडकलेल्या मजुरांना आपापल्या गावी पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पण रेल्वे सुटणार नाही, गर्दी करायची नाहीये. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून उत्तम प्रतिसाद मिळाला असून लवकरच यावर निर्णय घेतला जाईल. राज्यात कुठल्याही फळांच्या वाहतुकीवर बंधने नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.

बाजारसमित्या सुरु असून शेतकऱ्यांना मान्सूनपूर्व कामांमध्ये काहीही अडचण भासणार नाही याची काळजी कृषी विभागाकडून घेतली जात आहे. शिवभोजन थाळीच्या माध्यमातून दररोज एक लाखांपेक्षा अधिक थाळी गरिबांना दिल्या जात आहेत. दोन पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना त्यांना वीरमरण आले असल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संबोधनातील मुद्दे

  • आरोग्य, दूत, सफाई कामगार, यांच्यात देव. लोकांनी जो संयम पाळला त्यामध्ये देव. – मुख्यमंत्री ठाकरे
  • लॉकडाऊनमुळे काय झाले ? कोरोनाचा गुणाकार रोखण्यात आपल्याला यश आले. ती वाढ आपण नक्कीच काही प्रमाणात आटोक्यात आणली. – मुख्यमंत्री ठाकरे
  • दोन पोलीस कोन्स्टेबलचा कोरोनामुळे मृत्यू झाला, कोरोनाशी लढताना ते शहीद झाले. – मुख्यमंत्री ठाकरे
  • पोलिसांवर संशय व्यक्त करण्याआधी त्या वेळच्या परिस्थितीची अभ्यास करायला हवा- मुख्यमंत्री ठाकरे
  • चहूबाजूंनी सरकार म्हणून जे काही करता येईल. ते सारंकाही करत आहोत. – मुख्यमंत्री ठाकरे
  • डाळ गहू अद्याप केंद्राकडून आले नाही ते मिळाले पाहिजेत
  • मुंबईत थोड शिथिल केले तर वर्दळ वाढली, हा विषाणू संपूर्णपणे हद्दपार करावयाचा आहे
  • संयम राखावयाचा आहे; विषाणू अद्यापही आपला संयम कधी तुटतोय ते बघतो आहे
  • राज्यात केवळ २० टक्के रुग्णांना करोनाची लागण; सुदैवाने ८० टक्के नागरिकांना यामधील लक्षणे तपासणीदरम्यान दिसत नाहीत
  • गर्दी टाळून पुढे जावयाचे आहे त्यामुळे राज्य सरकार जिल्यातील अंतर्गत मुभा दिली जात आहे
  • जिल्हाबंदी आहे तशीच ठेवली आहे
  • केंद्राचे पथक मुंबई आणि पुण्यात, त्रयस्थपणे सूचना करण्याचं आवाहन, दोन दिवसापासून केशरी शिधापत्रिका धारकांना सवलतीच्या दरात धान्यवाटप . – मुख्यमंत्री ठाकरे
  • केंद्रीय मंंत्री नितीन गडकरींनी राजकारण बाजुला ठेवून सहकार्य केले.- मुख्यमंत्री ठाकरे
  • महाराष्ट्रात अडकलेल्या मजुरांना आपापल्या गावी पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरु, पण रेल्वे सुटणार नाही. गर्दी करायची नाही, संयमाने करण्याची गरज, अन्यथा तपस्चर्या वाया जाईल.- मुख्यमंत्री ठाकरे
  • चहूबाजूंनी सरकार म्हणून जे काही करता येईल. ते सारंकाही करत आहोत. – मुख्यमंत्री ठाकरे
  • आरोग्य, दूत, सफाई कामगार, यांच्यात देव. लोकांनी जो संयम पाळला त्यामध्ये देव. – मुख्यमंत्री ठाकरे
  • लक्षने दिसली तर क्लिनिकमध्ये जा. घरच्या घरी उपचार करू नका. अंगावर काढले तर विषाणू रौद्र रूप धारण करेल, कोरोनावर औषध नसले तरी काळजी घेतल्यास बरा होतो. – मुख्यमंत्री ठाकरे
  • संकटाच्या काळातही काहीजण राजकारण करतायत. – मुख्यमंत्री ठाकरे
  • नॉन-कोविड रुग्णांसाठी डायलिसीस सेंटर, हृदयविकार, कर्करोगग्रस्तांसाठी उपचार सुरु, डॉक्टरांनी दवाखाने बंद करू नये. – मुख्यमंत्री ठाकरे
- Advertisment -

ताज्या बातम्या