Thursday, April 25, 2024
Homeनगरढगाळ वातावरण व रिमझीम पावसाने वाढवली शेतकऱ्यांची चिंता

ढगाळ वातावरण व रिमझीम पावसाने वाढवली शेतकऱ्यांची चिंता

राहाता l प्रतिनिधी

तालुक्यात सर्वदूर रिमझीम पावसाने हजेरी लावली तर दिवसभर सुर्यदर्शनही होवू शकले नाही. हवामान खात्याने पावसाचा वर्तवलेला अंदाज खरा ठरला. रिमझीम पाऊस आणि सततच्या ढगाळ वातावरणामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे.

- Advertisement -

सध्या रब्बी हंगामासाठी शेतक-यांची लगबग सुरू आहे. अनेक शेतक-यांनी कांदा, हरबरा, गहू व ज्वारीची पेरणी केली आहे. ढगाळ वातावरणामुळे व पावसामुळे या पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. औषध फवारणीचा खर्च देखील वाढला आहे. अनेक शेतक-यांनी अद्याप पेरण्या केलेल्या नाहीत त्यांनाही पोषक वातावरणासाठी वाट बघावी लागणार आहे.

पेरू, द्राक्ष, बोर आदी फळपिकांना देखील या वातावरणाचा फटका बसत आहे. फळांची गुणवत्ता टिकवण्यासाठी शेतक-यांना कसरत करावी लागणार आहे. दरम्यान पावसामुळे गारवा वाढल्याने अनेकांना हुडहूडी भरली.

- Advertisment -

ताज्या बातम्या