Friday, April 26, 2024
Homeनगरनगरच्या गिर्यारोहकांनी केला वजीर सुळका सर

नगरच्या गिर्यारोहकांनी केला वजीर सुळका सर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

युवा पिढीला इतिहासाची ओळख निर्माण व्हावी, यासाठी इंद्रप्रस्थ ट्रेकर्सने युवकांना संघटित करून महाराष्ट्रभर असलेल्या गडकिल्ले सफर मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून किल्ल्याचे वैशिष्ट्य, महत्त्व व इतिहास युवकांपुढे मांडण्याचे काम केले जाते, युवा पिढीमध्ये इतिहासाची गोडी निर्माण होण्यास मदत होती. नुकताच ठाणे जिल्ह्यातील वजीर सुळक्यावर इंद्रप्रस्थ ट्रेकर्सच्या 30 गिर्यारोहकांनी सर केल्याची माहिती अनिल वाघ यांनी दिली.

- Advertisement -

ठाणे जिल्ह्यातील माहूली किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला वजीर सुळका इंद्रप्रस्थच्या 30 गिर्यारोहकांनी सर करून यशस्वीरित्या कामगिरी पार पाडली. यावेळी ट्रेकर्सचे संस्थापक वाघ, अनिष वाघ, सोनाली वाघ, शौनक वाघ, कार्तिक म्हस्के, सौरभ अग्निहोत्री, वाघेश्वर लिमन, प्रियांक चव्हाण, अनिकेत आवटे, अमोल हिंडे, आदित्य इकडे, श्रद्धा गोरे, कांचन पानसंबळ, मनीषा काकडे, विशाल सोनावणे, रोहित दारंदले, मयूर आठरे, वैभव वाटकर, आदित्य इकडे, अपूर्वा इकडे, विशाल भंडारी, राज गुप्ता, विशाल पवार तसेच अवघ्या दोन वर्षे वय असलेल्या अनिष वाघ या चिमुकल्यासह वजीर सुळका पार केला.

ठाणे जिल्ह्यातील माहूली किल्ल्याच्या पायथ्याशी वजीर सुळका आहे ज्याची उंची 200 फूट एवढी आहे. तर माहूली किल्ला हा समुद्र सपाटीपासून 2 हजार 800 फूट आहे. 200 फूट उंच असलेला वजीर सुळका सर करण्यासाठी अतिकठीण श्रेणीत गणला जातो. त्याच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी वांद्रे गावातून तीन तासांची अतिशय दमछाक करणारी पायपीट करावी लागते.दुर्गम परिसर, उंच टेकड्या, घनदाट जंगल, निसरडी वाट दोन्ही बाजूने खोल दरी, पाठीवर ओझे, सुळक्याच्या पूर्वेकडील दरीचा उतार जवळपास सहाशे फूट आणि पाण्याची प्रचंड कमतरता आहे.त्यामुळे या सुळक्यावर ट्रेकिंग करायचं ठरवलं आणि इकडचा पाय तिकडे पडला तर थेट दरीच्या जबड्यातच विश्रांती.

- Advertisment -

ताज्या बातम्या