Saturday, April 27, 2024
Homeनाशिकरुग्णवाहिका खरेदीचा मार्ग मोकळा

रुग्णवाहिका खरेदीचा मार्ग मोकळा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषदेला ( Zilla Parishad Nashik ) प्राप्त चौदाव्या वित्त आयोगाच्या निधी व्याजावरील निधीतून 32 रुग्णवाहिकांच्या खरेदीचा( Purchase of Ambulance ) मार्ग मोकळा झाला आहे.जिल्हा परिषदेच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत ( GBM ) खरेदी बाबतच्या निविदेला सभागृहाने मंजुरी दिली आहे.

- Advertisement -

चौदाव्या वित्त आयोगाच्या निधी व्याजावरील निधीतून खरेदी करावयाच्या रुग्णवाहिकांना वाढीव जीएसटीचा फटका बसल्यानंतर 35 ऐवजी 32 रुग्णवाहिका खरेदी करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या मागील सर्वसाधारण सभेत झाला होता.

त्यानंतर 32 रुग्णवाहिका खरेदीसाठी निविदा काढण्यात आल्यानंतर अवघ्या तीनच निविदा प्राप्त झाल्या. यातील कमीत कमी दर असलेल्या फोर्स मोटर्स कंपनीच्या निविदेचा प्रस्ताव सभेपुढे सादर झाला असता, त्यास मंजुरी देण्यात आली. त्यामुळे रखडलेल्या 32 रुग्णवाहिका खरेदीचा मार्ग खुला झाला आहे.

जिल्ह्यात 14 व्या वित्त आयोगाच्या निधीवरील व्याजाची रक्कम सुमारे दहा कोटी रुपये होती. या रकमेतून ग्रामविकास विभागाने करोना प्रतिबंधात्मक आयुर्वेदिक व औषधे खरेदी करून या खरेदीला संबंधित जिल्हा परिषदांनी प्रशासकीय मान्यता देण्याचे आदेश दिले होते. मात्र, नाशिक जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या निधीतून औषध खरेदी करण्यापेक्षा पुणे जिल्हा परिषदेच्या धर्तीवर प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी रुग्णवाहिका खरेदी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ वनारसे यांनी केली होती.

याविभागाने पाच कोटी रुपये निधी मंजूर केला. त्यानंतर प्रशासनाने याबाबत तांत्रिक मान्यता मिळवत जीईएम पोर्टलवर 35 रुग्णवाहिकांचे खरेदी दर निश्चित केले. मात्र, याच दरम्यान 1 ऑक्टोबरला जीएसटी कौन्सिलच्या झालेल्या तिमाही बैठकीत रुग्णवाहिकांवरील जीएसटी दर 12 टक्क्यांवरून वाढवून तो 28 टक्के केला गेला.

जीएसटी वाढल्याने एका रुग्णवाहिकेची किंमत 15 लाख 50 हजार 331 रुपये झाली. या हिशोबाने प्राप्त निधीतून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला केवळ 32 रुग्णवाहिका खरेदी करणे शक्य होणार होते. त्याबाबत दि. 7 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत वाढीव जीएसटीमुळे रुग्णवाहिकांची संख्या घटणार असल्याचे आरोग्य विभागाने निदर्शनास आणून देत, प्रशासनाने नव्याने 32 रुग्णवाहिका खरेदीस करण्यास मान्यता घेतली होती.

त्यानंतर आरोग्य विभागाने 32 रुग्णवाहिका खरेदीसाठी दि. 31 डिसेंबर 2021 रोजी निविदा प्रक्रिया राबविली. यात ऑनलाइन तीन निविदा प्राप्त झाल्या. दि. 10 जानेवारी 2022 रोजी या निविदा उघडण्यात येऊन त्यास तांत्रिक मान्यता देण्यात आली. त्यानंतर प्राप्त झालेल्या तीन निविदा आणि त्यांचे दर मान्यतेचा प्रस्ताव सभेत होता. यावर चर्चा होणे अपेक्षित होते. परंतु, घाईघाईत विषय मंजूर केल्याने यातील कमीत कमी दर असलेल्या कंपनीकडून रुग्णवाहिका खरेदी विषय क्रमांक 24 देखील मंजूर झाला. त्यामुळे आरोग्य विभागाकडून 32 रुग्णवाहिका खरेदी केल्या जाणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या