Thursday, April 25, 2024
Homeधुळेधुळ्यात पावसाळ्यापुर्वी नाले सफाई

धुळ्यात पावसाळ्यापुर्वी नाले सफाई

धुळे Dhule। प्रतिनिधी

महापालिका प्रशासनाने (Municipal administration) पावसाळ्यापुर्वी (Before the rains

- Advertisement -

) नाले सफाईला (Drain cleaning) सुरुवात केली आहे. पावसाळ्यात नाल्यांमध्ये घाण व झाडेझुडपे यामुळे पाणी साचू नये यासाठी नाले सफाई मोहिम हाती घेतली आहे.

पुत्र वियोगाचा, शोक अनावर झाला,
मातेनेही आपुला, प्राण मग त्यागला.!

महापालिका स्थायी समिती सभापती शीतल नवले यांनी आरोग्य व स्वच्छता विभागाचा (Department of Health and Hygiene) आढावा घेवून नाले सफाईचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रभाग क्र. 12 मधील स्लाटर हाऊस जवळील नाल्याची सफाई करुन नाले सफाईला (Cleaning of drains )प्रारंभ झाला. नाले सफाईच्या कामाच्यासाठी महापालिकेतर्फे निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र विलंब झाल्याने प्रक्रिया सुरु असतांना महापालिकेने नाले सफाईचे काम हाती घेतले आहे. निविदा प्रक्रिया पुर्ण झाल्यावर कामाचा ठेका दिला जाणार आहे. अशी माहिती सहाय्यक आरोग्य अधिकारी (Assistant Health Officer) चंद्रकांत जाधव यांनी दिली आहे.

हागर्‍या, मोती, सुशी, रंगनाला, अन्वर, स्लाटर हाऊस जवळील नाला असे आठ नाले शहर व परिसरातून वाहतात. त्यापैकी हागर्‍या, मोती, सुशी, रंगनाला, अन्वर हे नाले मोठे आहेत. या नाल्यांभोवती अतिक्रमण करुन घरे बांधण्यात आली आहे. यामुळे या नाल्यांची रुंदी कमी झाली आहे. रुंदी कमी झाल्यामुळे नाल्यांमध्ये घाण साचून झाडझुडपे वाढतात. त्यामुळे पावसाळ्यात (monsoon) पाणी वाहण्यास अडथळा निर्माण होतो. म्हणून महापालिका प्रशासनाने पावसाळ्यापुर्वी नाले सफाईची मोहिम हाती घेतली आहे.

पावसाळा केवळ 15 दिवसांवर येवून ठेपला आहे. या कालावधी नाले सफाई करावयाची आहे. नाले सफाई पुर्णपणे केली नाही तर नाल्यात पाणी वाहत नाही. नाल्यांमधील पाणी वसाहतींमध्ये घुसते. गेल्या दोन वर्षापुर्वी नाले सफाई व्यवस्थीत न केल्यामुळे वसाहतींमध्ये पाणी घुसले होते. यंदा तरी तसा प्रसंग उद्भवू नये म्हणून नाले सफाई कागदावर न दाखवता खर्‍या अर्थाने करावी, अशी अपेक्षा धुळेकरांनी व्यक्त केली आहे.

नाले सफाई सोबतच नाल्यांभोवती करण्यात आलेले अतिक्रमणही हटविणे गरजेचे आहे. परंतू याबाबत अद्याप महापालिका प्रशासनाने कार्यवाही सुरु केलेली नाही. केवळ अतिक्रमणधारकांना नोटीसा (Notice to Encroachers) बजावल्या आहेत. नाले सफाईबाबतचा आढावा पदाधिकार्‍यांसह अधिकार्‍यांनी घेतल्यास खर्‍या अर्थाने नाले सफाई होईल. परंतू यासाठी एसी कॅबीनमधून बाहेर उन्हात जावून पाहणी करावी लागेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या