Wednesday, April 24, 2024
Homeजळगावआमदार येणार म्हणून कोविंड सेंटरमध्ये सफाई

आमदार येणार म्हणून कोविंड सेंटरमध्ये सफाई

रावेर|प्रतिनिधी Raver

येथील कोविंड केअर सेंटर मध्ये सुविधा आणि सोयी बाबत दिरंगाई होत असून,या बाबींकडे तहसीलदार आणि पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष जाणवत आहे.रविवारी आमदार शिरीष चौधरी कोविंड सेंटरवर भेटीसाठी येत असल्याने साफ सफाई केली जात आहे.अचानक झालेला बदल पाहून दाखल असलेल्या रुग्णांना नवल वाटले.

- Advertisement -

येथील कोविंड सेंटरमध्ये खोल्यांमध्ये असलेल्या स्वच्छतेबाबत उदासीनता आहे.पालिकेने नेमलेले कर्मचारी सफाई सोडून दुसरीच कामे करत असल्याचे दृष्टीत पडत आहे.या सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांचा भरणा झालेला असल्याने,आता नव्याने इमारत अधिग्रहित करण्याची आवश्यकता वाढली आहे.शिवाय आता सुरू असलेल्या सेंटर मधील बेडवर अद्याप बेडशीटचा पुरवठा करण्यात आलेला नसल्याने सुविधांचा अभाव जाणवत आहे.स्वच्छता नावाला करत आहे.एखादा महत्वाचा व्यक्ती दाखल झाला तर या ठिकाणी सफाई केली जात असल्याचा आव आणला जातो,अन्यथा कोणी कितीही तक्रारी करू द्या काही फरक पडत नाही.रविवारी कोविंड सेंटर मध्ये सफाई होतांना पाहून आश्चर्य वाटू लागले.सफाई मक्तेदार गणेश यांना विचारले असता आठवड्यातून एका सफाई करतो,मात्र आज आमदार शिरीष चौधरी येत असल्याने,सफाई केली जात असल्याचा त्याने सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या