Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशलग्नमंडपात उभे राहण्याआधी दाढी काढणे अनिवार्य; सोशल मीडियात धुमाकूळ

लग्नमंडपात उभे राहण्याआधी दाढी काढणे अनिवार्य; सोशल मीडियात धुमाकूळ

राजस्थान | वृत्तसंस्था Rajsthan

चित्रपटाच्या माध्यमातून अनेक ट्रेंड (Trending) रुजू होताना सर्वांनीच पहिले आहेत. मात्र, लग्नमंडपात नवरदेवाने येताना दाढी करूनच (clean shaving) प्रवेश करावा असे फर्मान कुणी काढले तर…. खरंच प्रश्न थोडा वेगळा असला तरी राजस्थानच्या पाली जिल्ह्यात (Rajsthan Pali) कुमावत समाजातील (Kumavat Community) पंचांनी लग्नासाठी आश्चर्यकारक नियम अनिवार्य केले आहेत….

- Advertisement -

त्यांनी जारी केलेल्या नियमांची सोशल मीडियात मोठी चर्चा आहे. चेहऱ्यावरील कुरूपपण झाकण्यासाठी दाढी अनेकजन ठेवतात असे सर्रास बोलले जाते. कुमावत समाजातील पंचांनी जिल्ह्यातील 19 गावांच्या लोकप्रतिनिधींनी एका बैठकीत नवीन नियमांचा ठराव संमत केला.

त्यानुसार, गावातील कोणत्याही कुटुंबातील विवाह विधींमध्ये वराला क्लीन शेव्ह (clean shaving) करने बंधनकारक करण्यात आले आहे. वराच्या दाढीबाबत दिलेल्या अनोख्या फर्मानाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

या निर्णयाच्या नंतर सोशल मीडियात (Social Media Viral) मोठी चर्चा सुरु झाली आहे. जर नवरदेवाने दाढी करून लग्नमंडपात यायचे असेल तर वधुलाही मेकअप न करता मंडपात हजर करावे. या कमेंटला भरभरून लाईक्स मिळाल्या आहेत.

दुसरीकडे, विकी कौशलसह (vicky kaushal) अनेक सिनेअभिनेत्यांनी दाढी ठेवून लग्न केले आहे, तर त्यांना दाढी करण्याचा सल्ला या बाजारगप्पांनी दिला आहे. दुसरीकडे ग्रामीण भागात अनेक मुलांचे लग्न होण्यासाठी अडचणी येतात त्यांनी या पोस्टवर त्यांनीही राग व्यक्त करत आमचे लग्नच होत नाहीत तर दाढीचा प्रश्नच येत नसल्याचे म्हटले.

सोशल मीडियात (Social Media) काय कधी आणि केव्हा व्हायरल (Viral) होईल सांगता येत नाही. कुठल्यातरी राज्यातल्या एका जिल्ह्यापुरता मर्यादित असलेला हा विषय सबंध देशात चर्चेचा विषय अवघ्या काही तासांत ठरल्याचे दिसून येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या