Thursday, April 25, 2024
Homeनगर845 ग्रामपंचातींच्या हद्दीत सुरू होवू शकते वर्ग

845 ग्रामपंचातींच्या हद्दीत सुरू होवू शकते वर्ग

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनाच्या पहिल्या (Corona) लाटेनंतर राज्य सरकारच्या (State Government) मान्यतेनंतर जिल्ह्यात अटीशर्तीला अधीन राहुन 22 नोव्हेंबरपासून 9 वी ते 12 वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. त्याच धर्तीवर आता करोनाची दुसरी लाटेचा (second wave of corona) प्रभाव कमी झालेल्या आणि करोनामुक्त झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये (Grampanchayat) यंदा 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सध्या 845 ग्रामपंचायती करोनामुक्त असून या ठिकाणी टप्प्याने शाळा सुरू होवू शकते, अशी माहिती शिक्षण विभागाच्या (Department of Education) सुत्रांनी दिली.

- Advertisement -

जिल्ह्यात करोनाच्या (District Corona) दुसर्‍या लाटेचा प्रभाव वाढल्याने 15 एप्रिलपासून राज्यात पुन्हा दुसर्‍यांदा लॉकडाऊन (Lockdown) लावण्यात आला. यामुळे नोव्हेंबर ते एप्रिल दरम्यान साधारणपणे पाच महिने 9 वी ते 12 चे वर्ग भरले होते. आता दुसरी लाट ओसत असल्याचे पाहुन राज्य सरकारने 8 वी ते 12 वीपर्यंत शाळांचे वर्ग (school Class) भरविण्यास अटी शर्तीसह परवानगी दिली आहे. जिल्ह्यात सध्या 845 करोनामुक्त ग्रामपंचायती (Grampanchayat) असून त्याठिकाणी शालेय व्यवस्थापन समिती आणि गावच्या ग्रामपंचातीने पालकांच्या समंतीने ठराव घेतल्यास करोना नियमांचे पालन (Adherence to corona Rules) करून टप्प्याने शाळा सुरू होवू शकतात. यात शिक्षकांची करोना चाचणी, शाळा आणि परिसर निर्र्जुंकीकरण याह कोविड नियमांचे (Covid Rules) सर्व पालन करण्यात येणार आहे.

करोनामुक्त ग्रामपंचायती

अकोले 79, संगमनेर 101, कोपरगाव 60, राहाता 32, श्रीरामपूर 29, राहुरी 55, नेवासा 39, शेवगाव 72, पाथर्डी 59, जामखेड 47, कर्जत 71, श्रीगोंदा 66, पारनेर 46 आणि नगर 89 असे आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या