Friday, April 26, 2024
Homeजळगावआयुध निर्माणीच्या अधिकार्‍यांत मारामारी

आयुध निर्माणीच्या अधिकार्‍यांत मारामारी

वरणगाव Varangaon, ता. भुसावळ । वार्ताहर

येथील ऑडनन्स फॅक्टरीमध्ये (ordnance factory) कार्यरत असलेले संयुक्त महाप्रबंधक (Joint General Manager) यांना मारहाण करून जखमी (Injured by beating) केले आहे. ही घटना 14 रोजी दुपारी 11.45 वाजेच्या दरम्यान वरणगांव फॅक्टरीत घडली असून. आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात स्वातंत्र्या दिनाच्या पूर्वी संधेला हा प्रकार समोर आल्याने याबाबत नागरिकांत चर्चा रंगत आहे.

- Advertisement -

वरणगांव ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये नेहमी काही करणामुळे छोटे छोटे वाद सुरू असतात. मात्र या वादाकडे महाप्रबंधक दुर्लक्ष करीत असल्याने दिवसेदिवस त्यांची हिम्मत वाढत आहे. जर आधीच महाप्रबंधकांनी लक्ष दिले असते तर एस. आर. पाटील या अधिकार्‍यास त्यांचे ज्युनियर अमृत पाल यांनी पेपर वेट मारून फेकले नसते. आज या घटनेमुळे एस. आर. पाटील यांना शिविगाळ केली डोक्याला पेपर वेट मारला व बोटावर पेपरवेटने मारले. या घटनेत पाटील यांना दोन टाके पडल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली.

जाईट जीएम एस. आर. पाटील यांना ऑर्डनन्स फॅक्टरी दवाखान्यात प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आले. डॉ. समीर यांनी उपचार करून भुसावळ खाजगी हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले होते.

याबाबत पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव फॅक्टरीमधील अधिकारी पदावर असलेले शैलेश पाटील हे कर्तव्यावर असताना त्यांनी अमृता पाल या अधिकार्‍यास तुम्ही ड्युटी वरून गायब का झाले होते. याबाबत विचारणा केली असता अमृत पाल याने पाटील यांच्या केबिन मधील पेपरवेट उचलून त्यांच्या डोक्यावर व बोटावर मारला.

त्यामुळे पाटील यांच्या डोक्याला दोन टाके बसलेले असून उजव्या हाताचे दोन बोटे फ्रॅक्चर झाल्याचे समजते तसेच भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात सिटीस्कॅन करण्यात आले असून तो रिपोर्ट अजून बाकी आहे. अमृत पाल यांच्या मारहाणी नंतर कार्यालयासमोर युनियन पदाधिकार्‍यांनी गर्दी केल्यानंतर अमृत पाल हे भुसावळ येथे घरी निघून गेले होते.

परंतु फिर्याद दाखल झाल्यानंतर वरणगाव पोलिसांनी अमृत पाल यास भुसावळ येथून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी शैलेश रामचंद्र पाटील (वय 51, रा. रेणूका नगर) यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस स्टेशनला भा.दं.वि. 156/22 भां.दं.वि कलम 326, 504 प्रमाणे अमृत पाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ए.पी.आय. आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय परशुराम दळवी करीत आहे.

महाप्रबंधक या घटनेबाबत काय भूमिका घेतात याकडे परिसरात चर्चा असुन कामगार, इंटक व भारतीय मजदूर संघाचे पदाधिकारी पोलीस स्टेशनला तळ ठोकून आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या