Sunday, April 28, 2024
Homeनाशिकलग्न समारंभासाठी मनपाची बस नाही

लग्न समारंभासाठी मनपाची बस नाही

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिकेच्या ( NMC ) वतीने शहरात सुरू केलेल्या सिटीलिंक बसमधून ( Citilink Bus ) शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रवास करतात. विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळ्ण्यासाठी शाळा व महाविद्यालयाच्या आवारतच बस पाससाठी जागा उपलब्ध करुन देण्यात येणार असून तेथूनच आता विद्यार्थ्याना पासेस दिले जाणार आहेत. दरम्यान, या निर्णयामुळे विद्यार्थ्याना मोठा दिलासा मिळणार आहे. यासह सिटीलिंक बससाठी उमराळे या ठिकाणासह आणखी दोन ठिकाणी मार्ग वाढविण्यात येणार आहे.

- Advertisement -

सिटीलिंक कंपनीची बैठक झाली. यावेळी महापालिका आयुक्त कैलास जाधव, महापौर सतीश कुलकर्णी, भाजप सभागृहनेते कमलेश बोडके यांच्यासह सिटीलिंकबसचे महाव्यवस्थापक मिलिंद बंड, शहर अभियंता नितीन वंजारी यांच्यासह इतर विभागाचे प्रमुख बैठकीसाठी उपस्थित होते.

गेल्या काही महिन्यांपासून तपोवन परिसरात सिटीलिंक बस डेपोचे सुरु असलेले संथ गतीचे काम पुन्हा एकदा चर्चिले गेले. यावेळी संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आली असून दंडही ठोठावण्यात आला आहे.

टाकळी मार्गे जाणार्‍या सिटी लिंक बसला अल्प प्रतिसाद मिळत असल्याने या मार्गावरील दोन तीन बसेस बंद करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच सिटीलिंक बस ही लग्न समारंभासह इतर खासगीकामाकरिता देता येणार नाही( Citilink buses cannot be used for other private functions, including wedding ceremonies. ). बसेसचे होणारे नुकसान टाळ्ण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मागील वर्षापासून शहरातील नागरिकांसाठी सिटीलिंक बस धावत आहे.

एसटी कर्मचार्‍यांनी संप पुकारल्याचा नाशिक शहरातील नागरिकांना याचा काही फटका बसला नाही. या कालावधीत सिटीलिंकचा मोठा आधार नाशिककरांना मिळाला. आगामी काळात आणखी दोनशे बसेस येण्याची शक्यता आहे. शहराच्या वीस किलोमीटरपर्यंत ही बस जात असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या