Friday, April 26, 2024
Homeनाशिकसिटीलिंकची बससेवा सकाळपासून ठप्प; प्रवाशांचे प्रचंड हाल

सिटीलिंकची बससेवा सकाळपासून ठप्प; प्रवाशांचे प्रचंड हाल

नाशिक | Nashik

नाशिक महापालिकेतर्फे (NMC) चालविण्यात येणाऱ्या नाशिक सिटी लिंक बस (Nashik Citilinc) सेवेच ग्रहण काही केल्या सुटायचे नाव घेत नाही. कारण आज सकाळपासून शहरातील सिटीलिंक बसची सेवा (Citilinc Bus Stopped) कोलमडली आहे…

- Advertisement -

गेल्या तीन महिन्याचा पगार थकल्याने सगळे कर्मचारी आक्रमक झाले आहे. यामुळे सगळ्या कर्मचाऱ्यांनी सकाळपासून संपाचे हत्यार उगारल (Citilinc workers on strike) आहे. अचानक सगळे कर्मचारी संपावर गेल्याने सकाळपासून शहरातील बससेवा खंडित झाल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.

राहुल गांधींच्या अडचणी वाढणार? स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू सात्यकी यांनी दाखल केली तक्रार

यापूर्वीही नाशिक सिटीलिंकच्या कर्मचाऱ्यांनी अनेकवेळा अचानक संप पुकारला असून प्रत्येकवेळी पगाराचेच कारण आहे. पगार वेळेवर होत नसल्याची कर्मचाऱ्यांची कायम तक्रार आहे. आताही गेल्या तीन महिन्यांपासून पगार झालेला नाही. त्यामुळे बससेवेचे सर्व कंत्राटी कर्मचारी वैतागले आहेत.

IPL 2023 : गुजरात-पंजाब विजयी हॅटट्रिकसाठी सज्ज

मात्र, सिटीलिंकच्या कर्मचाऱ्यांनी अचानक पुकारलेल्या या संपामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहे. सकाळपासून शहरातील विवध बस स्थानकांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळत आहे. शहरातील सिटी बससेवेचा हजारो प्रवासी लाभ घेत असतात, खासकरुन सकाळच्या वेळी प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. मात्र, आज सकाळपासून रस्त्यावर एकही बस धावलेली नसल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या