Friday, April 26, 2024
Homeनगरशहर वाहतूक शाखा ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये

शहर वाहतूक शाखा ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी कामकाजात सुधारणा करण्याची तंबी दिल्यानंतर वाहतूक शाखेचे पोलीस ‘अ‍ॅक्शन मोड’ आले आहेत. शहरात विविध ठिकाणी वाहतूक शाखेच्या पथकांनी वाहन तपासणीसह बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई सुरू केली आहे.

- Advertisement -

शहरातील बेशिस्त वाहतूक व वाहतूक शाखेच्या ढिसाळ कारभार प्रकरणी शहरवासीयांमधून तक्रारी वाढत होत्या. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडेही तक्रारी झाल्या होत्या. त्यानंतर अधीक्षक पाटील यांनी मंगळवारी शहर वाहतूक शाखेत जाऊन कामकाजाचा आढावा घेतला. कामकाजात सुधारणा करण्याची तंबी देऊन एक महिन्याची मुदत दिली आहे.

पोलीस अधीक्षकांनी तंबी दिल्यानंतर शहर वाहतूक शाखा अ‍ॅक्टिव्ह झाली आहे. शहरात विविध ठिकाणी वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचार्‍यांकडून वाहनांची तपासणी सुरू झाली आहे. विना परवाना वाहन चालविणारे, बेशिस्तरित्या पार्किंग करणारे, ट्रिपल सीट फिरणार्‍या वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे वाहन चालकांचे धाबे दणाणले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या