Friday, April 26, 2024
Homeनगरनगर शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक शिळीमकर यांची बदली

नगर शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक शिळीमकर यांची बदली

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांची एक महिन्याच्या आत पुणे ग्रामीण येथे बदली झाली आहे.

- Advertisement -

आस्थापना विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक राजेश प्रधान यांनी त्यांच्या बदलीबाबतचे आदेश काढले आहे.

शहर वाहतूक शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अविनाश मोरे यांची 31 ऑक्टोबर रोजी नंदुरबार येथे बदली झाली होती. यानंतर हे पद दहा दिवस रिक्त होते. शहरात वाहतूकीची समस्या वाढत असल्याने जिल्हा विशेष शाखेत कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांची तत्काल वाहतूक शाखेच्या निरीक्षकपदी बदली करण्यात आली होती.

शिळीमकर यांनी 14 नोव्हेंबरला निरीक्षकपदाचा पदभार हाती घेतल्यानंतर बेशिस्त वाहन चालकांविरूद्ध कारवाई करून लाखो रूपयांचा दंड वसूल केला. यामध्ये शहरातील ट्रिपल सीट दुचाकीस्वारांविरूद्ध त्यांनी कारवाईची विशेष मोहिम हाती घेतली. परंतू, त्यांची एक महिन्याच्या आत बदली झाली आहे.

महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 22 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून आस्थपना विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक राजेश प्रधान यांनी निरीक्षक शिळीमकर यांची पुणे ग्रामीण येथे बदली केली आहे. याबाबत त्यांनी नगर व पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना कळविले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या