Wednesday, April 24, 2024
Homeनगरशहर पोलिसांकडून अनधिकृत पार्किंगवर कारवाई

शहर पोलिसांकडून अनधिकृत पार्किंगवर कारवाई

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहर वाहतूक शाखेने अनधिकृत पार्किंग, विना नंबर व फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहन चालकाविरोधात कारवाई सुरू केली आहे. शुक्रवार, शनिवार वाहतूक शाखेने 174 वाहन चालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून 37 हजार 900 रुपयांचा दंड वसूल केला.

- Advertisement -

धूमस्टाईल, पैशांच्या बॅग चोरी करणार्‍या लुटारूंकडून विना नंबर, फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांचा वापर होत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आहेत. तसेच शहरात रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात अनधिकृत पार्किंग होत असल्यामुळे वाहतूक कोंडी, अपघातात वाढ झाली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेने कारवाई हाती घेतली आहे. शुक्रवारी अनधिकृत पार्किंगच्या 50 तर शनिवारी 63 वाहन चालकांविरोधात कारवाई केली.

विना नंबर, फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहन चालकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान वाहन चालकांनी परिवहन विभागाकडील नियमांनुसार आपले वाहनावर नंबर प्लेट लावूनच वाहन चालवावे, तसेच वाहन अनधिकृत ठिकाणी रस्त्याच्याकडेला पार्क न करता प्रशासनाकडून दिलेल्या पार्किंगमध्येच पार्किंग करून शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याकरिता सहकार्य करावे, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या