Friday, April 26, 2024
Homeनगरनगरसेवकासह फॅमिलीही बेतली

नगरसेवकासह फॅमिलीही बेतली

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रिच फॅमिलीतील लोकांना करोनाची बाधा होण्याचा सीलसिला अजूनही सुरूच आहे. नगर शहरातील प्रसिध्दी हॉटेलचे मालक,

- Advertisement -

माजी नगरसेविका आणि विद्यमान नगरसेवक व त्यांच्या फॅमिलीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान नगर शहराने आता दहा हजाराचा टप्पा क्रॉस केला आहे.

नगर शहरात रोज शंभर-दोनशेच्या पटीत करोनाग्रस्तांची नावे पुढे येत आहेत. सामान्यपासून ते बड्या नेत्यांपर्यंत करोनाची बाधा होण्याचा सीलसिला सुरूच आहे. व्यापारी, उद्योजकांसोबतच नगरसेवकांनाही करोनाची बाधा होण्याचे प्रकार अजूनही थांबलेले नाहीत.

नगर शहरात एक नगरसेवक व त्यांच्या फॅमिलीतील तब्बल आठ जणांना करोनाची बाधा झाली आहे. याच नगरसेवकाच्या परिसरातील माजी नगरसेविका असलेल्या महिलेलाही करोना झाला आहे. अगोदर या महिलेचे पती बाधित झाले होते. माणिकनगरमधील एका व्यावसायिकालाही करोनाची बाधा झाली आहे.

महिनाभरापूर्वी घरात एखाद्याला करोनाची बाधा होत होती, आता फॅमिलीची फॅमिलीच बाधित होत असल्याचे दिसत आहे. पत्रकारांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. बहुतांश पत्रकार ठणठणीत होऊन घरी परतले असून काही अजूनही उपचार घेत आहेत. नालेगाव, तारकपूर, भूतकरवाडी, खिस्तगल्ली, कोठी रोड या भागात फॅमिलीतील मेंबर बाधित असल्याचे समोर आले आहे.

महापालिकेत पहिल्यादांच नगरसेवकाची संधी मिळालेल्या नगरसेवकाला करोना झाला आहे. त्यांच्या फॅमिलीतील भाऊ, भावजयी, पुतणे, दोन मुले, मुलगी अशा आठ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह निघाला आहे. नगरसेवकाच्या घरात एकाचवेळी आठ जणांना बाधा होण्याची नगरमधील ही पहिलीच वेळ आहे.

महापालिकेत नेतृत्व केलेल्या एका माजी नगरसेवकाची पत्नीही बाधित निघाली आहे. या अगोदर करोनाची बाधा झाली होती. आता पत्नीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह निघाला. पत्नीनेही काही काळ महापालिकेत प्रतिनिधीत्व केले आहे.

नगर शहरातील नामांकित असलेल्या हॉटेलमालकालाही कोरोनाची बाधा झाली आहे. या हॉटेलमालकाचा माजी नगरसेवक भाऊ पूर्वी बाधित निघाला होता. आता हॉटेलमालकाला करोना झाला आहे.

मिलिटरीचे 14 कोरोनाग्रस्त

मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या चौदा जणांना करोनाची बाधा झाली आहे. एकाचवेळी 14 पॉझिटिव्ह होण्याची ही पहिलीच वेळ आहे. संशयितांवर मिलिटरीच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांनी करोना टेस्ट करण्यात आली होती. ही टेस्ट पॉझिटिव्ह निघाली आहे.

तापकीर गल्लीत एकाच कुटुंबातील पाच

स्टेशन रोड, खिस्तगल्ली, तारकपूर, जुनाबाजार रोड, तापकिर गल्लीत एकाच कुटुंबातील अनेकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तापकिर गल्लीत तर एकाच कुटुंबातील पाच जणांना बाधा झाली. स्टेशनरोडवरील तिघे, खिस्त गल्लीत तिघे, जुना बाजार रोडवरील तिघे, तारकपूरला दोघे भाऊ, सर्जेपुरात तिघे, भूतकरवाडीत दोघी मायलेकी अशा एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक जणांना कोरोना झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या