Wednesday, April 24, 2024
Homeनंदुरबारनागरिकांचा तहसील कार्यालय व पालिकेवर धडक मोर्चा

नागरिकांचा तहसील कार्यालय व पालिकेवर धडक मोर्चा

नवापूर – Navapur – श.प्र :

शहरातील देवळफळी भागातील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या अतिक्रमित धारकांना जागा रिकाम्या करून देण्यासाठी नगर परिषदेमार्फत नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

सदर भागातून महामार्ग जाणार असल्याने जवळजवळ 60 घर मालकांना नोटीस दिल्या आहेत.

त्यातील बहुतेक नागरिक हे रोज कमावून आपली उपजीविका भागवत आहेत तर काही नवापूर ग्रामपंचायतकाळापासून तेथे वास्तव्यास असल्याने नगर परिषदेने पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी यासाठी महिलांसह नागरीकांनी मुख्याधिकारी बी.सी.गावीत आणि तहसीलदार मंदार कुळकर्णी यांना निवेदन दिले आहे.

40 वर्षापासून नगर परिषदेचा कर भरत असल्याने स्थानिक नगरसेवक आणि सत्ताधारी काँग्रेसच्या विरोधात महिलांचा आक्रोश दिसून आला होता.

पालिका प्रशासनावर कर भरत असल्याने आम्हाला आमची पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी तहसीलदार कुलकर्णी यांच्याकडे शिष्टमंडळाने केली आहे.

तहसीलदार मंदार कुळकर्णी यांनी महिलांचा आक्रोश लक्षात घेत कॅबिनच्या बाहेर येऊन निवेदन देण्यासाठी आलेल्या महिला व नागरिकांशी संवाद साधत राष्ट्रीय महामार्ग आणि नगरपरिषद अधिकार्‍यांशी याबाबत चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

सदर प्रक्रिया दिवाळीनंतरच होईल दिवाळीत कोणाला ही त्रास दिला जाणार नाही, असेही सांगण्यात आले.

यावेळी नागरीकांनी सांगितले, आम्हाला पर्यायी जागा उपलब्ध न करून दिल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या