Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकसिटीलिंक वाहक संपाच्या तयारीत

सिटीलिंक वाहक संपाच्या तयारीत

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सिटीलिंक चालकांच्या पाठोपाठ आता वाहकांनी संपाचा इशारा दिला असून दोन महिन्यांपासून वेतन नसल्याची तक्रार केली जात आहे. याबाबत प्रशासनाच्या माद्यमातून त्यांच्याकडे आकारण्यात आलेल्या दंडाचा परिणाम असल्याचे एजन्सीकडून सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

सिटीलिंक बससेवेत वाहक कार्यरत आहेत त्यांच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणाच्या बसच्या अनेक फेर्‍या होत असतात. या वाहकांवर प्रशासनाद्वारे अनेक चुकांच्या बदल्यामध्ये मोठा दंड आकारण्यात आलेला आहे. त्यामुळे वाहकांमध्येही नाराजीचा वातावरण आहे.

वाहकांच्या विविध चुकांवरून त्यांना दंड आकारणी केली जाते. त्याच प्रामुख्याने कामावर उशिरा येणे, विना तिकीट प्रवासी आढळणे, पैसे घेऊन तिकीट न देणे यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश आहे. एका वाहकाच्या माध्यमातून दिवसाला होणार्‍या फेर्‍यांच्या हिशोबात कामावर लेट आल्यास 6000 रुपयांपर्यंत त्यांना दंड आकारणी करण्याचे प्रावधान आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

8 जुलै 2021 ते 31 मे 2023 दरम्यान या वाहकांवर 2318 केसेस करण्यात आलेल्या आहेत. या सर्व वाहकांकडून दंडाच्या माध्यमातून आतापर्यंत 1कोटी 27 दंड आकारणी करण्यात आली आहे. मॅक्स डिफेक्ट सिक्युरिटी एजन्सीच्या माध्यमातून या सेवा पुरवल्या जात असताना या सेवांच्या बदल्यात एजन्सीला 1 कोटी 35 लाख रुपये कमिशन मिळत आहे. त्यामुळे या वाहकांच्या दंडाची रक्कम भरावी लागली. तर एजन्सीला शुन्य रुपये वेतन मिळणार आहे. वाहकांकडून ही वसुली केल्यास त्यांचे वेतन शून्य राहणार आहे.

अशी स्थिती असल्याने यावर सुवर्ण मध्य काढण्यासाठी एजन्सीचे अधिकारी काल मनपा आयुक्तांची भेट घेउन त्यांच्याशी चर्चा करणार होते. याबाबत चर्चेतून काय निष्पन्न झाले ते समजलेले नाही. याबाबत सिटीलिंक प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची भूमिका समजू शकलेली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या