Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यासिनेमागृह आजपासून खुले

सिनेमागृह आजपासून खुले

मुंबई । वृत्तसंस्था

राज्य सरकारने अनलॉकसंदर्भात नवी नियमावली जाहिर केली आहे. आज दि. 5 नोव्हेंबरपासून राज्यातील सिनेमागृह, मल्टिप्लेक्स, नाट्यगृह 50 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

- Advertisement -

मात्र प्रेक्षकांना आत खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी नसेल. करोना रोखण्यासाठी घालून देण्यात आलेले सर्व नियम पाळणे बंधनकारक असेल.

लॉकडाऊन संपून राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. याअंतर्गंत अनेक निर्बंध शिथील करण्यात येत आहे. राज्यातील गेल्या सात महिन्यांहून अधिक काळासाठी बंद असलेल्या सिनेमागृहांसाठीही राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. करोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असताना राज्य सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यानंतर गर्दी टाळण्याच्या उद्देशाने सिनेमागृह देखील बंद ठेवण्यात आली होती.

आता मिशन बिगीन अगेन अतर्गंत अनेक सेवा पुन्हा सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने नागरिकांसाठी मोठा दिलासा आहे. सिनेमागृह, नाट्यगृह मल्टिप्लेक्स 50 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत उद्यापासून सुरू होणार आहेत.सिनेमागृहांसाठी सांस्कृतिक कार्य विभागाने जी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत ती या सेवेसाठी लागू असतील. त्याचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, अशी सूचना सरकारकडून देण्यात आली आहे.

इनडोअर खेळांसह जलतरण तलावांना परवानगी

राज्य सरकारने बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॉश या इनडोअर खेळांसह इनडोअर शूटींग रेंज सुरू करण्यास परवानगी दिली आहे. निर्जंतुकीकरणाची व्यवस्था आणि सामाजिक अंतरांच्या नियमांचे पाळून खेळाडूंना या ठिकाणी खेळाडूंना सराव करता येईल. राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या सरावासाठी जलतरण तलाव सुरू करता येतील. मात्र कंटेन्मेंट झोनमधील जलतरण तलाव बंदच राहतील. तसेच योगा अभ्यास केंद्रही सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या