Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याचित्रपटगृह व नाट्यगृह आज पासून खुले

चित्रपटगृह व नाट्यगृह आज पासून खुले

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोनाच्या corona प्रादुर्भावामुळे सर्वात आधी बंद झालेले सांस्कृतिक कार्यक्रमांचे हक्काचे व्यासपीठ रंगभूमी आणि चित्रपटगृह Cinema Theatersआजपासून (दि.22) शासन मान्यतेने खुली होत आहे. त्यानुसार रंगमंच आणि चित्रपटगृह व्यवस्थापनाने आपली तयारी झाली असल्याचे सांगितले.

- Advertisement -

तत्पूर्वी कालपर्यंत नाट्य व चित्रपटगृहात साफसफाई, सोशल डिस्टंगसिंगच्या दृष्टीने आसन व्यवस्था, सॅनिटायजेशन करण्यात आले. यावेळी जेव्हां प्रत्यक्ष प्रेक्षक प्रयोग किंवा सिनेमा पाहण्यासाठी येईल तेव्हा त्यांना थर्मल टेस्टद्वारे तापमानाची चाचणी घेऊनच सभागृहत प्रवेश देण्यास येणार असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले.

कालिदास, प. सा. त आज एकही प्रयोग नाही

मात्र प्रदीर्घ कालावधीनंतर सुरू झालेल्या नाट्यगृहात नाशिकमध्ये आज पहिल्या दिवशी कुठल्याही नाटकाचा प्रयोग होणार नाही. परंतु शहरातील अनेक नाट्यसंस्था प्रयोग करण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे येत्या 5 नोव्हेंबर रोजी मराठी रंगभूमीदिनी खर्‍या अर्थाने नाट्यगृहांचा पडदा उघडून शुभारंभ होईल.

अशी आहे नियमावली

सिनेमागृहातील खाद्यपदार्थाच्या स्टॉल्सचे कर्मचार्‍यांचे लसीकरण आवश्यक, ऑडिटोरिअम, कॉमन आणि वेटिंग एरियामध्ये गर्दी होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक, मल्टीप्लेक्समध्ये मध्यांतर एकाच वेळी होणार नाही, आरोग्य सेतूवरील त्यांची आरोग्यस्थिती सुरक्षित असणे आवश्यक राहील.

नाट्यगृहात अतिथींना कलाकारांच्या कक्षामध्ये परवानगी नाही, सर्व कक्ष सॅनिटाईज असणे अनिवार्य, सर्वासाठी मास्क आवश्यक, प्रेक्षकाची आसनक्षमता 50 टक्के असेल, बाल कलाकारांव्यतिरिक्त सर्व कलाकार, कर्मचार्‍यांचे लसीकरण आवश्यक.

नाट्यगृह व्यवस्थापनाने सर्व तयारी केली आहे. नाट्यगृह सॅनिटाईज करण्यात आली आहे. सगळ्या टेक्निकल गोष्टी तपासून घेतल्या आहेत. आता कलाकार, नाट्यसंस्थांना आवाहन आहे की, लवकरच नवीन प्रयोग घेऊन नाट्यगृहात यावे.

दिलीप बोरसे, व्यवस्थापक, प. सा. नाट्यमंदीर

- Advertisment -

ताज्या बातम्या