Saturday, April 27, 2024
Homeनाशिकसिन्नर : 'दिलखुश'ची किमया..! चक्क घराच्या छतावर कोथिंबीरीची लागवड

सिन्नर : ‘दिलखुश’ची किमया..! चक्क घराच्या छतावर कोथिंबीरीची लागवड

पाथरी | Pathari

शेती व्यवसायाची प्रचंड आवड पण अल्प शेती क्षेत्र त्यामुळे मनात निर्माण होणारे कृषी उत्पादनाचे अनेक विचारांना…

- Advertisement -

मूर्त स्वरूप देता येत नसल्याने कोळगाव माळ येथील दिलखुश मिया शेख या अल्पभूधारक शेतकऱ्याने चक्क घराच्या छतावर कोथिंबीरीची लागवड केली आणि ती यशस्वीही झाली.

दिलखुश शेख हे कोळगाव माळ येथील अत्यल्प भूधारक शेतकरी इतर मोठ्या शेतकऱ्यांप्रमाणे आपणही आपल्या शेतात वेगवेगळी नगदी पिके घेण्याचा विचार नेहमी त्यांच्या मनात येत असतो.

या विचारांना मूर्त स्वरूप देण्यासाठी दिलखुश ने वेगळीच शक्कल लढविली घराच्या छतावर पॉलिथिन पेपर पसरून त्यावर माती टाकली. त्यावर कोथिंबीरीचे बियाणे पेरले. काही दिवसांत चक्क कोथंबीर हवेबरोबर डोलू लागली. याचा त्यांना खूप आनंद झाला.

शेती क्षेत्र कमी असल्याने मनात घडणाऱ्या विचारांना प्राप्त झालेले मूर्त स्वरूप दिलखुश च्या परिवाराला एक वेगळाच आनंद देऊन गेले. हा नाविन्यपूर्ण उपक्रम चर्चेचा विषय ठरला

दिलखुश ने आपल्या घराच्या सभोवताली परसबाग फुलविली असून पेरू, सिताफळ, मिरची, फळ भाज्या, पालेभाज्यांची लागवड केली आहे. बाजारातून तो कोणताही भाजीपाला विकत घेत नाही. घराच्या परसदारात उगवलेला भाजीपाला तो उपयोगात आणतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या