Friday, April 26, 2024
Homeनाशिकसर्वपक्षीय नेत्यांचा सिडको मुख्य प्रशासकास घेराव

सर्वपक्षीय नेत्यांचा सिडको मुख्य प्रशासकास घेराव

नवीन नाशिक | प्रतिनिधी | Navin Nashik

सिडको (CIDCO) फ्री होल्ड (Free hold) करा त्यानंतर नाशिकचे (nashik) कार्यालय कोठेही स्थलांतरित करा यांसह विविध मागण्यांसाठी नवीन नाशकातील (navin nashik) सर्वपक्षीय नेत्यांसह (all party leaders) कार्यकर्त्यांनी

- Advertisement -

सिडकोचे मुख्य प्रशासक दीपा मुठोळ मुंडे (CIDCO Chief Administrator Deepa Muthol Munde) यांना घेराव घातला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (Nationalist Congress Party) कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सिडको प्रशासनाचा (CIDCO Administration) निषेध व्यक्त केला.

गेल्या काही दिवसांपासून सिडको कार्यालयाचे (CIDCO Office) स्थलांतर, येथील अधिकारी कर्मचारी बदल्या तसेच कार्यालयात चारच कर्मचारी ठेवत असल्याने २५ हजार घरे, पाच हजार मोकळी भूखंड या मिळकत धारकांची विविध परवानगीन करता मोठ्या प्रमाणावर गैरसोय होणार आहे. याबाबत कार्यालयाचे स्थलांतर थांबा व प्रशासक कायम ठेवा, यांस व विविध प्रश्नांच्या मागणीसाठी सोमवारी सिडाको च्या मुख्य प्रशासक दीपा मुठोळ मुंडे यांना सर्वच पक्षीय पदाधिकाऱ्यांसह नवीन नाशिककरांनी यांनी घेराव घातला.

पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या चुकीच्या निर्णय विरोधात जोरदार घोषणाबाजी केली तसेच विविध प्रश्नांबाबत निवेदनही (memorandum) देण्यात आले. सिडको मुख्य प्रशासक नाशिक सिडको कार्यालयात येणार असल्याची बातमी परिसरात पसरताच अनेक नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते (Social workers), नगरसेवक (Corporator), राजकीय पक्षाचे विविध पदाधिकारी यांनी सिडको कार्यालय गाठत सिडको कार्यालय येथून स्थलांतरित करू नये याबाबत आग्रह धरला होता.

आधी सिडको फ्री होल्ड (Free hold) करा आणि कार्यालय कुठेही घेऊन जा या मुद्द्यावर सिडकोवासिय अजूनही ठाम आहेत. प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (Nationalist Congress Party) वतीने सिडको कार्यालयासमोरच सिडको वासियांचे दिशाभूल करणाऱ्या भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या व सिडको कार्यालयाचे स्थलांतरित करणाऱ्या मुख्य प्रशासक दीपा मुढोळ- मुंढे यांचा आंदोलन करीत जाहीर निषेध करण्यात आला. तर जोरदार घोषणाबाजी करत , कांचन बोधले यांच्या विरोधात घोषणा दिल्या.

यावेळी आमदार सीमा हिरे, शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नाना महाले, ऍड. तानाजी जयभावे, ऍड. अजिंक्य गिते,मकरंद सोमवंशी,अर्जुन वेताळ,छाया देवांग,राहुल गणोरे,विजय पाटील,मामा ठाकरे, संजय भामरे, बाळासाहेब गीते, देवेदे पाटील, संतोष सोनपसारे, प्रशांत जाधव, कैलास चुंभळे, अमर वझरे, अविनाश पाटील, राहुल सोनवणे,कृष्णा काळे, अमोल नाईक, संतोष भुजबळ, गणेश पवार आदीसह सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या