Saturday, April 27, 2024
Homeधुळेदोंडाईचातील घटनेची सीआयडी चौकशीची मागणी

दोंडाईचातील घटनेची सीआयडी चौकशीची मागणी

दोंडाईचा – Dondaicha – श.प्र :

पोलिसांनी मुस्लिम समाजाची तक्रार नोंदवून घेतली नाही. उलट त्यांना मारहाण करुन आरोपी सारखी अटक केली.

- Advertisement -

पोलिसांनी आधी अ‍ॅक्शन घेतली म्हणूनच त्याची रिअ‍ॅक्शन आली, असे सांगत दोंडाईचा पोलीस ठाण्यावर झालेल्या हल्ल्याचे आपण समर्थन करतो असे स्पष्ट मत समाजवादी पार्टीचे नेते आ.अबु आझमी यांनी व्यक्त केले. या घटनेत या घटनेची सीआयडी चौकशीची मागणीही त्यांनी केली.

दोंडाईचात अल्पवयीन मुलीची छेड काढण्यावरुन झालेल्या वादाला वेगळे वळण लागत पोलीस ठाण्यावर जमावाने हल्ला केला. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एकजण जखमी झाला. तर जमावाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला.

या घटनेला आठवडा उलटल्यानंतर आज आ.आझमी यांनी मृताच्या कुटुंबियांची आणि जखमीची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. ते म्हणाले, दोंडाईचातील ही घटना मुळातच पोलिसांच्या चुकीचा परिणाम आहे.

मुस्लिम समाजाची तक्रार ऐकून घेतली असती तर पुढील प्रसंग उद्भवला नसता. या घटनेतील मृताच्या कुटुंबियांना 25 लाख तर जमीला 5 लाख रुपये मदत मिळवून देण्याचा आपला प्रयत्न राहील असेही ते म्हणाले.

दोंडाईचातील घटनेत शहाबाज शहा या तरुणाचा मृत्यू झाला आहे. वास्तविक या घटनेशी त्याचा काही संबंध नव्हता. परंतु आपल्या समाजातील तरुणांना अटक झाल्याचे आणि काहीतरी गडबड झाल्याची खबर मिळाल्याने मदतीच्या उद्देशाने तो घराबाहेर पडला.

परंतु जमावाने त्यास भोसकुन मारले आहे. वास्तविक तक्रारदार कोणत्याही समाजाचा असो पोलिसांनी प्रामाणिकपणे भूमिका बजावली, तक्रारदाराचे म्हणणे ऐकून घेतले तर अशा घटना घडणारच नाहीत.

मात्र खाकी वर्दीतील सरकारी मानसीकता असलेले आणि धार्मिक भावनेने काम करणारे पोलीस अशा चुका करतात, म्हणूनच दोन धर्मियांमध्ये तेढ निर्माण होते. खरेतर या देशात आपल्याला ऐकोप्याने रहावयाचे आहे असेही आ.आझमी म्हणाले.

न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही

देशातील सध्याची न्याय व्यवस्था आरएसएस व भाजपाच्या विचार धार्जिनी आहे. त्यामुळे या न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास नाही, असे मत आ.आझमी यांनी व्यक्त केले. तसेच मुस्लिम समाजातील मुला-मुलींनी आपल्याच समाजात विवाह करावा. म्हणजे दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही असेही आवाहन त्यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या