Tuesday, April 23, 2024
Homeनगरनाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत भाविकांची गर्दी

नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत भाविकांची गर्दी

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

नाताळ तसेच शासकीय सुटया, सरत्या वर्षाला निरोप, नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी शिर्डीत भाविकांच्या गर्दीत वाढ होत आहे.

- Advertisement -

करोनाच्या संकटामुळे मंदिर प्रशासनाने नियम व अटी लागू करत साईदर्शनाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. वाढती गर्दी लक्षात घेता सहा ऐवजी बारा हजार भाविकांना दर्शनासाठी संस्थानाने परवानगी दिली आहे. दरम्यान भाविकांची सुरक्षितता तसेच सुलभ दर्शन व्हावे, यासाठी संस्थान व पोलीस प्रशासन अलर्ट झाले आहे. पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे.

शिर्डीत दरवर्षी नाताळाच्या सुट्टयात भाविकांची अलोट गर्दी साईबाबांच्या दर्शनासाठी होत असते.मात्र यंदा करोना संकटामुळे गर्दीवर मोठा परीणाम झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी गर्दी कमी असल्याचे चित्र दिसत आहे. प्रतिदिन बारा हजार भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात येत आहे.

त्यामुळे दर्शनास येण्यापूर्वी भाविकांनी मोफत व पेड दर्शनाचे पास येण्यापूर्वीच ऑनलाईन बुकींग करुन यावे, असे आवाहन संस्थानने केले आहे. भाविकांना मोफत पासची सुविधा भक्तनिवास येथे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. भाविकांना चांगले दर्शन व्हावे, दर्शन रांगेत गर्दी होणार नाही, यासाठी संस्थानने उपाययोजना केल्या आहेत.

संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभागाचे अधिकारी भाविकांना सोईसुविधा उपलब्ध व्हाव्या, त्यांची गैरसोय होणार नाही, यासाठी उपाय योजना करत आहे.

पोलीस प्रशासनाने सुरक्षा व वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी बंदोबस्तात वाढ केली आहे. शिर्डीत नगर-मनमाड महामार्गावर लक्ष्मीनगर पाँईट ते रत्नारक बँक चौकापर्यंत नो व्हेईकल झोन जाहीर केला आहे. वाहतूक शाखेचे अधिकारी, शिर्डी पोलीस स्टेशनचे अधिकारी भाविकांची सुरक्षा व वाहतुकीचे नियोजन करत आहे.

साईमंदिर भाविकांसाठी खुले झाले मात्र गर्दीत वाढ नसल्याने धंदे नसल्याने व्यावसायिक अडचणीत आहेत.संस्थानने मंदिर खुले केले असले तरी चार नंबर व तीन नंबरचे प्रवेशद्वार बंद ठेवल्याने येथील व्यावसायकांचे नुकसान होत आहे. भाविक दोन नंबर गेटने आत व पाच नंबर गेटने बाहेर पडत असल्याने गर्दी असूनही धंदे नसल्याने व्यावसायिकांत नाराजी दिसत आहे.संस्थानने हे गेट खुले करावे,अशी मागणी केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या