Wednesday, May 8, 2024
Homeजळगावख्रिसमनिमित्त ख्रिश्चन बांधवांची विश्व शांतीसाठी प्रार्थना!

ख्रिसमनिमित्त ख्रिश्चन बांधवांची विश्व शांतीसाठी प्रार्थना!

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

नाताळ सणानिमित्त (Christmas) शहरातील विविध चर्चमध्ये (Church) शनिवारी विविध कार्यक्रमासह विश्व शांतीसाठी ख्रिश्चन बांधवांनी (Christian brothers) शनिवारी ख्रिसमस सण साजरा (Celebrate the festival) केला.

- Advertisement -

शहरातील पांडे डेअरी चौक येथील डॉ. अ‍ॅन्ड रेव्ह. फ्रेड विल्यम शिलँडर मेमोरिल अलायन्स चर्च येथे ख्रिस्ती बाधवांचा नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. अ‍ॅन्ड रेव्ह. फ्रेड विल्यम शिलँडर मेमोरिल अलायन्स चर्चमध्ये नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर 23 डिसेंबर ते 1 जानेवारी 2022 पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमांचे 23 डिसेंबर रोजी रेव्हरंट शशिकांत एम. वळवी यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. शनिवारी रेव्हरंट शशिकांत वळवी यांच्यासह खिश्चन बांधवांनी सकाळी प्रार्थना व उपासनेस सुरुवात केली. सुरुवातीस ख्रिस्ती बांधवांनी ख्रिसमस कॅरर्ल्स म्हणजेच नाताळ गीते गायली. यात प्रामुख्याने युवकसंघ व लहान बालके यांचा सहभाग होता.

त्यानंतर बायबल वाचन करण्यात आले. विश्वशांती, जागतिक आरोग्य, ओमायक्रोन महामारीतून सर्व मानवजातीचा बचाव व्हावा, यासाठी प्रार्थना करण्यात आली. याप्रसंगी रेव्हरंट. शशिकांत एम. वळवी यांनी आपल्या प्रवचनात सांगितले की, येशू शांतीचा अधिपती होता. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी सर्व मानवजातीस शांती मिळावी व तारण प्राप्त व्हावे, यासाठी बेथलेहेम गावी गायीच्या गोठयात येशूचा जन्म झाला होता. येशूची शिकवण ही सर्व मानवासाठी आहे. त्याच्या शिकवणीनुसार आचरण केल्यास मनाला शांती मिळते. उपासनेनंतर सर्व ख्रिस्ती बांधवांनी एकमेकांना अलिंगण व हस्तोंदालन न करता भारतीय रुढी परंपरेनुसार दोन्ही हात जोडून नमस्कार करुन नाताळाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रार्थना सभेत जळगाव शहरातील ख्रिस्ती समाज बहुसंखेने उपस्थित होता.

यशस्वीतेसाठी सचिव प्रा.विनय गायकवाड, पंच सदस्य प्रकाश शिंदे, एस.बी.गावीत, नितीन मकासरे, अनिल मसीदास, संजय पारधनी, एलिझबेथ वळवी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यशस्वीतेसाठी स्मीता पारधनी, पवन गवांदे, अमोल देशपांडे, किरण देशपांडे,संदीप कसोटे, रेवती कसोटे प्रणाली बनसोडे, युवक संघ व संडेस्कुल आणि महिला संघाचे प्रमुख यांनी परिश्रम घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या