Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्या‘चला जाणूया नदीला’ उपक्रमांतर्गत नदीयात्रेला आज सुरुवात

‘चला जाणूया नदीला’ उपक्रमांतर्गत नदीयात्रेला आज सुरुवात

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह ( Hydrologist Dr. Rajendra Singh)जिल्हा दौर्‍यावर येत असून दि.22 व 23 फेब्रुवारी असे दोन दिवस त्यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्ह्याची सरपंच परिषद, ‘चला जाणूया नदीला’ या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत नदीयात्रेचा शुभारंभ तसेच पर्यावरण संवर्धनातील महत्वाचे उपक्रम सुरू करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

या दौर्‍यात बुधवारी (दि.22) येवला तालुक्यातील कुसमाडी येथे त्यांच्या हस्ते ‘चला जाणूया नदीला’ या महाराष्ट्र शासन व जलबिरादरी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील 108 नद्यांच्या सर्वेक्षण तथा पुनरूज्जीवन कार्यक्रमांतर्गत मोती नदीच्या उगमस्थानी नदीचे पूजन, कच्चे बंधारे इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दुपारी 5 वाजता बेलगाव ढगा येथे नंदिनी नदीच्या पाणलोटाची व तिथल्या पर्यावरण संवर्धन कामाची डॉ. राजेंद्र सिंह पाहणी करतील. सायंकाळी 6-30 ते 8 परमानंद स्पोर्टस अकॅडमी येथे नीर नारी नदी हा पर्यावरणीय नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

गुरुवारी (दि. 23) राह फाउंंडेशनच्या दरी, अंजनेरी, ब्रह्मगिरी येथील महत्वाकांक्षी वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ डॉ. राजेंद्र सिंह यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. राह फाउंंडेशन नाशिकमध्ये 45 लाख झाडांचे वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम राबविणार आहे. या उपक्रमातंर्गत सुरूवातीच्या टप्प्यात या तीन स्थळांवर वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दुपारी 1 वाजता ‘चला जाणूया नदीला’ या अभियानात सहभागी असलेल्या विविध विभागांच्या अधिकार्‍यांची व जल प्रहरींची बैठक नाशिक मनपा आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत नाशिक महापालिकेत होईल. दुपारी 3 ते 5 या कालावधीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी आयोजित केलेल्या टँकरमुक्त नाशिक या अभियानाचा शुभारंभ होणार आहे. त्यानंतर जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह पर्यावरण कार्यकर्त्यांशी संवाद साधतील, अशी माहिती नमामी गोदा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पंडित यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या