Friday, April 26, 2024
HomeजळगावPhotos # चित्ररथ, साहसी खेळांंनी वेधले लक्ष

Photos # चित्ररथ, साहसी खेळांंनी वेधले लक्ष

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

सरदार वल्लभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel) यांच्या जयंती (Jayanti) निमित्त जळगाव शहरात आज लेवा पाटील समाज उत्सव समितीतर्फे (Leva Patil Samaj Utsav Samiti) मिरवणूक (Procession) काढण्यात आली. मिरवणूकीत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचे चित्ररथ, ढोल ताश्यांच्या गजरात साहसी खेळांनी जळगावकरांचे लक्ष वेधले.

- Advertisement -

लेवा पाटील समाज उत्सव समितीतर्फे सोमवार दि.31 रोजी सायंकाळी टॉवर चौक येथून मिरवणूकीला सुरवात झाली. यावेळी आमदार राजूमामा भोळे, नगरसेवक सुनिल खडके, नगरसेवक विष्णू भंगाळे, नगरसेवक डॉ. विरेन खडके, नगरसेवक कैैलास सोनवणे, नगरसेविका सीमा भोळे, नगरसेविका उज्वला बेंडाळे, नगरसेेविका गायत्री राणे आदी मान्यवरांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमा पुजन करून मिरवणूूकीला सुरवात झाली. मिरवणूकीत विविध मंडळातर्फे सरदार वल्लभभार्ई पटेल यांच्या जीवनाची माहिती सागणारे विविध चित्ररथ, ढोल ताशे. डिजेच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. लेवा भवन येथे सरदार वल्लभभार्ई पटेल यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मिरवणूकीची सांंगता झाली.

अखंड भारत चित्ररथ

मिरवणूकीत विविध मंडळाने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनकार्याचे माहिती असलेले चित्ररथ रथ तयार केले होते. यात देशातील 305 संस्थांचे अखंड भारतात विलीणीकरण यांची सविस्तर माहिती असलेला चित्ररथ, तसेच विविध कार्याची माहिती देणारे चित्ररथ, लेवा पाटीलदार समाजाचा इतिहास हा चित्ररथ देखील पाहण्यासारखा होता. तसेच सोरटी सोमनाथ मंदिराची तयार केलेली प्रतिकृती लक्ष वेधणारी होती.

चित्तथरारक साहसी खेळांचे प्रदर्शन

मिरवणूकीत उत्सव समितीतर्फे विविध चित्तथरारक साहसी खेळांचे आयोजन केले होते. त्यात दाणपट्टा, तलवारबाजी, लाठी तसेच दोरखंड अशा साहसी खेळांचे प्रदर्शनाने जळगावकरांचे लक्ष वेधले.

महिला, युवतींचा देखील सहभाग

उत्सव समितीतर्फे आयोजित सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त आयोजीत मिरवणूकीत मोठ्या संख्येने महिला तसेच युवतींनी देखील मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. मुलींनी साहसी खेळांचे देखील प्रात्यक्षीक सादर केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या