Friday, April 26, 2024
Homeनगरचितळी येथील अल्पवयीन मुलीच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल

चितळी येथील अल्पवयीन मुलीच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

राहाता (Rahata) तालुक्यातील चितळी (Chitali) येथील अल्पवयीन मुलीच्या मृत्यूप्रकरणी (Minor Girl Death Case) गावातील एका तरुणावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल (Filed a Crime) करण्यात आला आहे. हा तरुण गावातून यापूर्वीच पसार झालेला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

- Advertisement -

आदिवासी समाजातील (Tribal Society) 14 वर्षे वयाच्या मुलीचा गुरुवारी सायंकाळी एका घरात ओढणीने गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला होता. हे घर आकाश राधू खरात याचे असून ते मुलीच्या घरापासून हाकेच्या अंतरावर आहे.

घटनेनंतर गुरुवारी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात (Shrirampur Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र मुलीचे कुटुंबीय व नातेवाईक त्यावर समाधानी नव्हते. मृत्यूमागे घातपात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला होता. आरोपीचे नाव त्यांनी पोलिसांना सांगितले होते. मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, त्यानंतरच तसा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलिसांचे म्हणणे होते. शुक्रवारी रात्री नगर येथील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. गळफास घेतल्याने मृत्यू झाल्याचे प्राथमिक शवविच्छेदन अहवालात (Preliminary autopsy report) म्हटले आहे. अद्यापही अहवालातून काही गोष्टी समोर येणार आहेत.

शनिवारी दुपारी मयत मुलीची आई मंगल आनंदा कांबळे यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नं. 49/2021 प्रमाणे आकाश राधू खरात याचेविरुध्द भादंवि कलम 306 अन्वये दाखल करण्यात आला आहे.

आकाश हा मुलीला लग्नाची मागणी घालत होता, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. शुक्रवारी रात्री चितळी गावात मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे पथकासह उपस्थित होते. घटनेपूर्वी मुलगी बेपत्ता झाली होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे आकाश खरात याच्या घरात तिचा मृतदेह मिळून आल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे राहिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या