Friday, April 26, 2024
Homeनगरचितळीतील कृषी सेवा केंद्र फोडून 'एवढ्या' लाखाचा ऐवज चोरला

चितळीतील कृषी सेवा केंद्र फोडून ‘एवढ्या’ लाखाचा ऐवज चोरला

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

राहाता तालुक्यातील चितळील येथील कृषी सेवा केंद्राचे शटर उचकटून चोरट्यांनी मका बियाणेचे 13 बॅग, फवारणी औषध 2 बॉक्स, कोरेजनचे 10 नग असे एकूण 2 लाख 74 हजार रुपये किंमतीचा माल चोरट्यांनी चोरुन नेला. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास राहाता तालुक्यातील चितळी येथील मौनगिरी कृषी सेवा केंद्राचे शटर अज्ञात चोरट्यांनी उचकटवून दुकानात प्रवेश करुन मका बियाणेचे 13 बॅग किंमत 1 लाख 95 हजार रुपये, कोराजन (फवारणी औषध) 2 बॉक्स किंमत 60 हजार रुपये, कोरेजनचे 10 नग किंमती 19 हजार रुपये असा एकूण 2 लाख 74 हजार रुपयांचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला. चोरीची माहिती श्रीरामपूर तालुका पोलिसांना तातडीने देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होवून चौकशी करुन माहिती घेतली तसेच पंचनामा केला. यावेळी श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके, श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. भोसले, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री. शिंदे यांनी भेट देवून घटनेची माहिती घेवून चौकशी केली.

याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात शिवाजीराव नायराणराव कदम यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा रजि. नं. 373/2022 प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुध्द भादंवि कलम 457, 380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री. शिंदे हे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या