Thursday, April 25, 2024
Homeनंदुरबारसरदारनगर येथे श्रमदानातून वनराई बंधारा

सरदारनगर येथे श्रमदानातून वनराई बंधारा

चिनोदा – ता .तळोदा – Taloda – वार्ताहर :

तळोदा तालुक्यातील सरदारनगर येथे लुपिन फाउंडेशन व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला.

- Advertisement -

धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील शेतकर्‍यांसोबत बी.सी.आय.सुधारित कापूस आदर्श पध्दती प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत जैवविविधता व पाणी व्यवस्थापनासाठी विविध उपक्रम ही संस्था हाती घेत असते.

बी.सी.आय.सत्व प्रकल्पा अंतर्गत स्थानिक शेतकरी सहभागातून व श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला.

यासाठी ग्रामपंचायत सरदारनगर येथील सरपंच सायदीबाई वसावे, उपसरपंच नारसिंग तडवी, पोलीस पाटील, ग्रामसेवक मनोज वसावे, ग्रामपंचायत सदस्य आदींसह ग्रा.पं.कर्मचारी तसेच लुपिन फाउंडेशन संस्थेचे विभागीय कार्यक्रम व्यवस्थापक योगेश राऊत, वरिष्ठ प्रकल्प समन्वयक सुनील सैंदाणे, प्रकल्प व्यवस्थापक लक्ष्मण खोसे, प्रकल्प समन्वयक दिपक जाधव, पी.यु.मॅनेजर किरण पाटील, करमसिंग पावरा आदींनी परिश्रम घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या