Tuesday, April 23, 2024
Homeनंदुरबारचिनोदा शेतशिवारात बिबट्याने पाडला बोकडचा फडशा

चिनोदा शेतशिवारात बिबट्याने पाडला बोकडचा फडशा

चिनोदा, Chinoda ता.तळोदा । वार्ताहर

तळोदा Taloda तालुक्यातील चिनोदा Chinoda farm येथील शेतशिवारात बिबट्याने एका बोकडवर हल्ला leopard knocked down a goat केल्याने चिनोदा परिसरातील शेतकरी, शेतमजूर तसेच ग्रामस्थांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे वन विभागाने Forest Department बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.

- Advertisement -

दि.15 आँगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास चिनोदा-नवागांव रस्त्यावर असलेल्या नगिन नथ्थू पटेल यांच्या केळीच्या शेताच्या बांधावर जंगल्या हारक्या पाडवी यांच्या शेळ्या व बोकड चरत असतांना केळीच्या शेतातून बिबट्याने एका बोकडवर हल्ला केला. यात बोकडाचा मृत्यू झाला. त्यामुळे चिनोदा शेतशिवारात बिबट्याचा मुक्त संचाराने शेतकरी, शेतमजूर तसेच ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भितीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासह पिंजरा लावण्याची मागणी करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या