Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशचीननेच तयार केला करोना विषाणू, माझ्याकडे पुरावे

चीननेच तयार केला करोना विषाणू, माझ्याकडे पुरावे

नवी दिल्ली | New Delhi

चीनने करोना विषाणू लष्करी प्रयोगशाळेत तयार केला असा दावा चीनमधून अमेरिकेत पलायन केलेल्या एका महिला वैज्ञानिकाने यापूर्वीच केला आहे. आता पुन्हा त्यांनी करोना विषाणू मानवनिर्मितच असून

- Advertisement -

आपण लवकरच याबद्दल पुरावे सादर करणार असल्याचे म्हटले आहे. डॉ. ली-मेंग असे या प्रसिद्ध महिला वैज्ञानिकाचे नाव आहे.

करोनाचा विषाणू मानवनिर्मित असल्याचा संशय पूर्वीपासूनच व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, चीनमधील अनेक शास्त्रज्ञांनीही यावर आपलं मत व्यक्त केलं होतं. डॉ.ली-मेंग या सुद्धा चीनमधील प्रसिद्ध विषाणूशास्त्रत्र असून त्यांनी चीनमधून पळ काढला आहे. सध्या त्या अमेरिकेत वास्तव्यास असून हा विषाणू मानवनिर्मित असल्याचा दावा त्यांनी पुन्हा केला आहे. तसेच, याबाबतचे लवकरच पुरावे सादर केले जातील असंही सांगितले आहे. शिवाय, वुहानच्या मासळी बाजारातून हा विषाणू फैलावला असल्याच्या बातम्या दिशाभूल करणार्‍या आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

चीनचा मांस बाजार हा एखाद्या पडद्यासारखा वापरण्यात आला आहे. या पडद्यामागे बर्‍याच घडामोडी झाल्या आहेत. हा विषाणू नैसर्गिक नाही. वुहानच्या प्रयोगशाळेतून हा विषाणू बाहेर आला असल्याचाही दावा त्यांनी केला.

त्यांनी सांगितले की, जीनोमचा सिक्वेन्स हा माणसाच्या बोटांच्या ठशांसारखा आहे. याआधारावर त्याची ओळख पटवता येऊ शकते. भक्कम पुराव्याच्या आधारे हा विषाणू प्रयोगशाळेतून आला असल्याचे सांगणार आहे

करोनाबाबतची माहिती चीनच्या सरकारी डेटाबेसमधून हटवली आहे. सहकार्‍यांना माझ्याविरोधात अफवा पसरवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. करोना विषाणूंचा अभ्यास करणार्‍या पहिल्या मोजक्या काही शास्त्रज्ञांपैकी आपण एक असल्याचे त्यांनी म्हटले. चीन सरकार आपल्या जीवावर उठले असून हाँगकाँगमधून अमेरिकेत स्थलांतरीत झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, चीनने करोनाचा विषाणू वुहान येथील प्रयोगशाळेत बनवला असल्याचा आरोप याआधीदेखील अनेकदा फेटाळून लावला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील दबावासमोर झुकत चीनने जागतिक आरोग्य संघटनेच्या चौकशी पथकाला करण्यासाठी चीनमध्ये प्रवेश दिला. वुहान प्रयोगशाळेच्या संचालकांनीही करोना विषाणू प्रयोगशाळेत निर्मित झाला नसल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, चीनच्या वुहान शहरातून पसरलेला करोना संसर्ग संपूर्ण जगभर थैमान घालतो आहे. त्यामुळे हा विषाणू कसा तयार झाला, कृत्रिमरित्या तयार की नैसर्गिक तयार झाला यावर बरेच संशोधन सुरू आहे. त्यामुळे याविषयी चीनकडे अख्ख्या जगाचं लक्ष आहे. चीनच्या प्रयोगशाळेतूनच करोना विषाणूचा प्रसार झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या मुद्यावर चीनने जगभराचा रोष ओढवून घेतला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या