Thursday, April 25, 2024
Homeनाशिकयेवला तालुक्यातील 'हे' गाव झाले करोनामुक्त

येवला तालुक्यातील ‘हे’ गाव झाले करोनामुक्त

येवला । Yeola

चिचोंडी खुर्द गावात मागील महिन्यात वाढता करोना संसर्ग गावाची चिंता वाढविणारा होता. परंतु गावातील सर्व नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे योग्य रित्या पालन करून, करोनाला अखेर गावातून हद्दपार करून, गाव करोनामुक्त केले आहे.

- Advertisement -

गावामध्ये निवडक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला, अनेकांना धडकी भरविणारा करोना संसर्ग थांबायला तयार नव्हता. हॉटस्पॉट क्षेत्र वाढत चालले होते, त्यात दिवसाला दोन, तीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असतांना गावातील अनेक कुटुंबातील व्यक्तींनी आपल्या घरिच राहण्याला पसंती देऊन आपले शेतीकाम केल्याने व गावातील सर्व नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे योग्य रित्या पालन करून करोना ला अखेर गावातून हद्दपार केले,

यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड , तहसीलदार प्रमोद हिले, गटविकास अधिकारी देशमुख, यांच्या मार्गदर्शनातून ग्रामपंचायत चे सरपंच मनीषा मढवई, उपसरपंच साईनाथ मढवई, ग्रामसेवक बी. बी. गायके, वैद्यकीय अधिकारी डॉ.जाधव व आरोग्यसेविका इतर सहकारी यांच्या अथक प्रयत्नातून गावाला मोठ्या धोक्यातून बाहेर काढण्यात यश मिळविले. त्यामध्ये गावातील किराणा दुकानदार, हॉटेल व्यावसाहिक व शेती तसेच शेतीविरहीत उद्योग व्यासयिकांनी करोना प्रतिबंध समितीच्या नियमांचे कडक पालन केले. सर्वांनी पार पाडलेल्या जबाबदारी मुळेच करोना मुक्त गाव करता आले.

गाव करोना मुक्त झाल्याने आपली सर्वांची जबाबदारी आणखी वाढली. आता गावात करोनाचा पुन्हा संसर्ग होऊ द्यायचा नाही त्यासाठी सर्व नियमांचे पालन करुन करोना प्रतिबंधात्मक नियम आपल्या कुटुंबाला व गावाला सुरक्षित ठेवतील आपले आरोग्य आपल्याच हातात आहे. आपले ही गांव करोना मुक्त होऊ शकते, विचार करा, शासन नियमांचे पालन करा

– मनीषा मढवई, सरपंच चिंचोडी खुर्द

- Advertisment -

ताज्या बातम्या