Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशचीनमध्ये 'टू चाइल्ड पॉलिसी' संपुष्टात

चीनमध्ये ‘टू चाइल्ड पॉलिसी’ संपुष्टात

दिल्ली | Delhi

वृद्ध होत चाललेली लोकसंख्या आणि लोकसंख्या वाढीचा मंदावलेल्या वेग, यामुळे चिंतित चीनने एक मोठा निर्णय घेतला आहे. 

- Advertisement -

चीन सरकारने कुटुंब नियोजनाच्या नियमांमध्ये ढिलाई आणण्याची घोषणा केली आहे. आज सोमवारी घेतलेल्या निर्णयानुसार, आता चीनमध्ये जोडप्यांना तीन मुले जन्माला घालता येणार आहेत. याआधी चीनमध्ये फक्त दोनच मुले जन्माला घालण्याची परवानगी होती.

चीनने काही वर्षांपासून लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी कडक नियम घातले होते.’टू चाइल्ड पॉलिसी’ अंतर्गत दोन मुलांना जन्म देण्याची परवानगी होती. या नियमामुळे देशातील लोकसंख्या नियंत्रणाला आली. मात्र देशातील अर्ध्याहून अधिक नागरिक वयोवृद्ध होत असल्याने चीनची चिंता वाढली आहे. त्यामुळे हा नियम शिथील करण्याचा निर्णय चीन सरकारने घेतला आहे.

चीनला का उचलले हे पाऊल?

चीनने नुकतेच आपल्या लोकसंख्येचे आकडे प्रसिद्ध केले होते. यानुसार, गेल्या दशकात चीनमध्ये मुले जन्माला येण्याच्या वेगाची सरासरी सर्वात कमी होती. याचे कारण चीनमधील टू-चाइल्ड पॉलिसी असल्याचे सांगण्यात आले होते. आकडेवारीनुसार, २०१० ते २०२० दरम्यान चीनमधील लोकसंख्या वाढीचा वेग ०.५३% एवढा होता. तर वर्ष २००० ते २०१० दरम्यान हा वेग ०.५७% होता. अर्थात गेल्या दोन दशकांत चीनमध्ये लोकसंख्या वाढीचा वेग कमी झाला आहे. एवढेच नाही, तर आकडेवारीनुसार, वर्ष २०२० मध्ये चीनमध्ये केवळ १२ मिलियन मुलेच जन्माला आली. तर २०१६ मध्ये हा आकडा १८ मिलियनवर होता. म्हणजेच चीनमध्ये १९६० नंतर मुले जन्माला येण्याचे प्रमाणही सर्वात कमी झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या