Friday, April 26, 2024
Homeनगरचायना मांजा प्रकरणी नगरपरिषदेच्या पथकाकडून जप्तीची कारवाई सुरू

चायना मांजा प्रकरणी नगरपरिषदेच्या पथकाकडून जप्तीची कारवाई सुरू

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर नगरपरिषदेने शहरातील वेगवेगळ्या परिसरात सर्रासपणे चायना मांजा विक्री करणार्‍या व्यावसायिकांविरुध्द कारवाई करण्यासाठी पथकाची नेमणूक केली आहे. या पथकाने चायना मांजा जप्तीची कारवाई सुरू केली आहे. पथकाने वेगवेगळ्या परिसरातील व्यावसायिकांकडून चायना मांजाच्या 13 आसर्‍या जप्त केल्या आहेत.

- Advertisement -

चायना मांजामुळे पशु, पक्षी, मनुष्य यांना ईजा होऊन कदाचित त्यांची प्राणहानी देखील होते. व दरवर्षी चायना मांजामुळे अनेक अपघाताच्या घटना होऊन नागरिकांना, पशु पक्षांना सदर चायना मांजाचा त्रास सहन करावा लागतो. या अनुषंगाने सालाबादप्रमाणे यावर्षी देखील नगरपरिषदेकडून चायना मांजा विक्री करणार्‍या व्यावसायिकांविरुध्द धडक जप्ती मोहीम राबविली जात आहे. अद्यापपावेतो जप्ती मोहिमेत शहरातील वेगवेगळ्या परिसरातील व्यावसायिकांकडून चायना मांजाच्या 13 आसर्‍या जप्त करण्यात आल्या आहेत.

सदर पथकाकडून ही मोहीम नियमितपणे सुरू राहणार असून चायना मांजाची विक्री करणार्‍या व्यावसायिकांनी यापुढील काळात चायना मांजाची विक्री करू नये, असे आवाहन श्रीरामपूर नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे. या पथकात आरोग्य विभाग प्रमुख रावसाहेब घायवट, स्वच्छता निरीक्षक संजय आरणे, प्रल्हाद जाधव, दत्तात्रय चव्हाण, सागर पंडागळे, नरेंद्र चव्हाण, अभिजित कांबळे, सौरभ जाधव, सिध्दार्थ चव्हाण, गणेश प्रधान, संतोष केदारे, दीपक शेळके, गणेश शिंदे आदी कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या