यंदाचा बालदिन ऑनलाईन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना महामारीमुळे यंदा शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्व शाळांना ऑनलाईन बालदिन साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहे.

तसेच त्यानिमित्त आठवडाभराचे भरगच्च कार्यक्रम तसेच विविध स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणार आहेत.

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस (14 नोव्हेंबर) बालदिन म्हणून साजरा केला जातो. या बालदिनाच्या निमित्ताने बालकांच्या सुप्त गुणांचा विकास व्हावा यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बाल दिवस सप्ताह (8 ते 14 नोव्हेंबर) साजरा करण्यात येणार आहे.

तशा सूचना शिक्षण विभागाने सर्व जिल्हा परिषदांना दिल्या असून शिक्षणाधिकार्‍यांनी याबाबत सर्व शाळांना सूचना पाठवल्या आहेत. राज्यातील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात भाग घेताना आपले पालक किंवा शिक्षक यांच्या फेसबूक अकाउंट किंवा इतर सोशल मीडियावरून आपल्या उपक्रमाचा व्हिडिओ, फोटो अपलोड करायचा आहे.

– असे आहे नियोजन

* 8 नोव्हेंबर- पहिली ते दुसरीसाठी भाषण

* 9 नोव्हेंबर- तिसरी ते पाचवीसाठी पत्रलेखन

* 10 नोव्हेंबर- सहावी ते आठवीसाठी स्वलिखित कविता वाचन

* 11 नोव्हेंबर- सहावी ते आठवीसाठी नाट्यछटा किंवा एकपात्री प्रयोग

* 12 नोव्हेंबर- नववी ते दहावीसाठी पोस्टर करणे, तसेच 11 वी ते 12 वी साठी निबंध स्पर्धा,

* 13 नोव्हेंबर-नववी ते दहावीसाठी निबंध लेखन, अकरावी ते बारावीसाठी व्हिडिओ तयार करणे.

* 14 नोव्हेंबर- पहिली ते बारावीसाठी बाल साहित्य संमेलन.

विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके

या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांमधून तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर प्रथम तीन क्रमांक देण्यात येणार आहेत. तसेच सहभागासाठी विद्यार्थ्यांना राखे पारितोषिकांसह प्रमाणपत्रही दिले जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *